मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियावर (Team India) कोरोनाचं संकट आलं आहे. इंग्लंडमध्ये असलेल्या टीम इंडियाच्या एका खेळाडूला (indian cricketer) कोरोनाची लागण (Corona Positive) झाली असून त्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या खेळाडूचे नाव समोर आले नाही. पण या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. या खेळाडूला टीमपासून वेगळं ठेवण्यात आले आहे. या खेळाडूला सध्या त्याच्या नातेवाईकांच्या घरी क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.Also Read - Ration Card Holders: आनंदाची बातमी! रेशन कार्डधारकांना आणखी 4 महिने मोफत धान्य मिळणार

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेळाडूच्या घशात खवखव होत होती. त्यामुळे त्याची कोरोना तपासणी (Corona Test) करण्यात आली होती. त्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह (Corona Report Positive) आला. या खेळाडूच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना आणि इतर कर्मचाऱ्यांना तीन दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी आता संपला आहे. दरम्यान, आज टीम इंडिया या खेळाडूविना डरहॅममध्ये जाणार आहे. याठिकाणी टेस्ट सीरिजसाठी (England vs India Test Series) प्रॅक्टिस मॅच होणार आहे. कोरोनातून बरं झाल्यानंतर हा खेळाडू डरहॅमसाठी रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे. Also Read - Breaking News Live Updates: मुंबईमध्ये वरळीत निर्माणाधीन इमारतीतील बांधकाम लिफ्ट कोसळली; दुर्घटनेत चौघांचा मृत्यू

इंग्लंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी टीम इंग्लंडमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. 3 खेळाडूंसोबत सात जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. आता या सर्व खेळाडूंनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, भारत विरुद्ध इग्लंड पाच टेस्टची सीरिज 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. Also Read - Breaking News Live Updates: दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांमधील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत

भारत-इंग्लंडमध्ये होणाऱ्या टेस्ट सीरीजचे वेळापत्रक –

4-8 ऑगस्ट – भारत विरुद्ध इंग्लंड पहिली टेस्ट मॅच, ट्रेंट ब्रिज (नॉटिंघम)

12-16 ऑगस्ट – भारत विरुद्ध इंग्लंडची दुसरी टेस्ट मॅच, लॉर्ड्स (लंडन)

25-29 ऑगस्ट – भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी टेस्ट मॅच, हेडिंग्ले (लीड्स)

2-6 सप्टेंबर – भारत विरुद्ध इंग्लंड चौथी टेस्ट मॅच, केनिंग्टन ओव्हल (लंडन)

10-14 सप्टेंबर – भारत विरुद्ध इंग्लंड पाचवी टेस्ट मॅच, ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर)