Top Recommended Stories

Vinod Kambli Arrested: माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला वांद्रे पोलिसांकडून अटक, जामीनावर झाली सुटका!

Vinod Kambli Arrested : विनोद कांबळीने दारुच्या नशेत कार चालवत वांद्रे येथील एका सोसायटीच्या गेटवर आणि तक्रारदाराच्या गाडीला टक्कर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचप्रकरणी त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

Updated: February 27, 2022 10:56 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Former India cricketer Vinod Kambli
Former India cricketer Vinod Kambli

Vinod Kambli Arrested : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (former india cricketer vinod kambli) याला रविवारी वांद्रे पोलिसांनी (Bandra Police) अटक केली. विनोद कांबळीने दारुच्या नशेत कार चालवत वांद्रे येथील एका सोसायटीच्या गेटवर आणि तक्रारदाराच्या गाडीला टक्कर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचप्रकरणी त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली होती. पण जामीनावर त्याची सुटका (released on bail) झाली.

Also Read:

You may like to read

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळीने राहत असलेल्या सोसायटीच्या गेटवर गाडीने जोरदार धडक दिली. त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे.’ विनोद कांबळी दारु पिऊन गाडी चालवत होता. विनोद कांबळीने दारुच्या नशेत गाडी चालवत तक्रारदाराच्या गाडीला धडक मारली होती. त्याच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या तक्रारदार व्यक्तीनं या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दखल घेऊन विनोद कांबळीला अटक केली.

विनोद कांबळीला वांद्रे पोलिसांनी अटक केली. पण त्यानंतर विनोद कांबळीला जामीन मंजूर करण्यात आला. याआधी तो सायबर क्राईममध्ये देखील अडकला होता. KYC अपडेट करायला सांगून एकाने त्याला ठगवले होते. मात्र सायबर पोलिसांनी याचा छडा लावून रक्कम विनोदला परत केली होती. विनोद कांबळीने भारताकडून 17 कसोटी सामन्यांत 4 शतकं आणि 3 अर्धशतकांसह 54.20 च्या सरासरीने 1084 धावा केल्या आहेत. 104 वन डे सामन्यात त्याने 2 शतकं आणि 14 अर्धशतकांसह 2,477 धावा केल्या आहेत.

दरम्यान, विनोद कांबळी अनेक वादांमध्ये सापडला आहे. 2015मध्ये त्याच्यासह पत्नीवर घरामध्ये काम करणाऱ्या बाईने गंभीर आरोप केला होता. 2015 मध्ये विनोद कांबळी आणि त्याच्या पत्नी एंड्रिया हेव्हिट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. काम करणाऱ्या बाईने कामाचे पैसे मागितले म्हणून दोघांनी तिला तीन दिवस एका खोलीमध्ये बंद केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण त्यांनी तिच्यावर ड्रग्ज घेत असल्याचा आरोप केला होता.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 27, 2022 10:56 PM IST

Updated Date: February 27, 2022 10:56 PM IST