
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
FIFA World Cup: कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या (FIFA WORLD CUP 2022 ) दुसऱ्या उपांत्य फेरीत गतविजेत्या फ्रान्सने मोरोक्कोचा (France vs Morocco) 2-0 असा पराभव केला. या विजयासह फ्रान्सने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. तेथे त्याचा सामना 18 डिसेंबर रोजी लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाशी (Argentina) होईल. त्याचवेळी मोरोक्कोच्या पराभवामुळे आफ्रिकन आणि अरब देशांचे स्वप्न भंगले. तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत आता 17 डिसेंबरला क्रोएशियाशी लढत होईल.
फ्रान्सने बलाढ्य मोरोक्कन संघाचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसऱ्या सेमीफाइनलमध्ये त्यांनी 2-0 ने विजय मिळवला. फ्रान्ससाठी सामन्यातील पहिला गोल थियो हर्नांडेझने पाचव्या मिनिटाला केला. त्याच्यानंतर 79 व्या मिनिटाला रँडल कोलो मौनीने संघासाठी दुसरा गोल केला.
फ्रान्सचा संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. 2018 मध्ये त्याने अखेरच्या विजेतेपदाच्या सामन्यात क्रोएशियाचा पराभव केला होता. त्यानंतर 1998 नंतर तो चॅम्पियन बनला होता. फ्रान्स तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याकडे प्रतिक्षेत आहे. रविवारी (18 डिसेंबर) अंतिम फेरीत त्याचा सामना अर्जेंटिनाशी होणार आहे. अनुभवी फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने उपांत्य फेरीत क्रोएशियाचा पराभव केला होता.
दुसरीकडे, मोरक्कन संघ प्रथमच सेमीफाइनलमध्ये पोहोचला होता. तसेच सेमीफाइनल गाठणारा हा पहिला आफ्रिकन संघ आहे. जर मोरोक्कन संघाने उपांत्य फेरीत विजय मिळवला असता तर मोठ्या अपसेटमध्ये अंतिम सामना खेळणारा पहिला आफ्रिकन संघ बनून इतिहास रचू शकला असता. मात्र, पराभवाने त्यांचे हे स्वप्न भंगले आहे.