Top Recommended Stories

Glenn Maxwell Vini Raman Marriage: ग्लेन मॅक्सवेलने डान्स करत विनीला घातला पुष्पहार, कधीच पाहिला नसेल लग्नाचा असा VIDEO

Glenn Maxwell Vini Raman Marriage: ऑस्ट्रेलियन स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल आज त्याची भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमनसोबत विवाहबंधनात अडकला आहे. सोमवारी तामिळ प्रथेनुसार दोघांनी लग्नगाठ बांधली. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Published: March 28, 2022 11:35 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Glenn Maxwell Vini Raman Marriage: ग्लेन मॅक्सवेलने डान्स करत विनीला घातला पुष्पहार, कधीच पाहिला नसेल लग्नाचा असा VIDEO
Glenn Maxwell Vini Raman Marriage

Glenn Maxwell Vini Raman Marriage: ऑस्ट्रेलियन स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आज त्याची भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमनसोबत (Vini Raman ) विवाहबंधनात अडकला आहे. सोमवारी तामिळ प्रथेनुसार दोघांनी लग्नगाठ (Glenn Maxwell Vini Raman wedding) बांधली. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ (wedding video) खूप आवडला आहे. व्हिडिओमध्ये मॅक्सवेल आणि विनी हातात हार घेतलेले दिसत आहेत. डान्स करत दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातला. वरमाला घालताना मॅक्सवेल आणि विनी यांनी मागे वळून थोडी मस्ती देखील केली.

या दोघांनी गेल्या आठवड्यात ख्रिश्चन प्रथेनुसार लग्न केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मॅक्सवेल आणि विनी तामिळ प्रथेनुसार मेहंदीसह इतर विधी करत आहेत. आज दोघांनी लग्नगाठ (Glenn Maxwell Marriage) बांधली आहे.विनी रमन ही मूळची दक्षिण भारतातील तामिळनाडूची आहे. ती अनेक दशकांपासून मेलबर्नमध्ये कुटुंबासह राहत आहे. विनी व्यवसायाने फार्मासिस्ट आहे. मॅक्सवेल आणि विनी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. अनेकवेळा विनी स्टेडियममध्ये मॅक्सवेलला चिअर करतानाही दिसली आहे.

You may like to read

ग्लेन मॅक्सवेल लग्नामुळे ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्यावर गेला नव्हता. तो अद्याप त्याच्या आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा भागही बनलेला नाही. असे मानले जात आहे की 6 एप्रिल रोजी मॅक्सवेल आयपीएलमध्ये त्याच्या फ्रेंचायझीमध्ये सामील होईल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.