GT vs LSG : IPL 2022 मध्ये पहिल्यांदा भिडणार गुजरात टायटन्स-लखनऊ सुपर जायंट्स, दोन्ही संघात आहेत हे स्टार खेळाडू
IPL 2022 GT vs LSG : गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ आयपीएलमध्ये आज पहिल्या सामन्याने पदार्पण करणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदा दहा संघ सहभागी होत आहेत.

IPL 2022 GT vs LSG : गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) हे दोन संघ आयपीएलमध्ये (IPL 2022) आज पहिल्या सामन्याने पदार्पण करणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2022) पहिल्यांदा दहा संघ सहभागी होत आहेत. गुजरात आणि लखनऊचा संघाचा हा पहिला हंगाम आहे. त्यामुळे दोन संघांच्या चाहत्यांसह सर्वच क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची प्रचंड उत्सुकता आहे.
Also Read:
- IND vs BAN T20 World Cup 2022: अटीतटीच्या सामन्यात भारत 5 धावांनी विजयी! भारताची उपांत्य फेरीची दावेदारी मजबूत
- Highlight IND vs SA 3rd T20 Score: दक्षिण आफ्रिकेने 49 धावांनी जिंकला सामना, मात्र टी-20 मालिका भारताने 2-1 ने जिंकली
- Ind vs SA 3rd T20: क्लीन स्वीप तर दूरच, दक्षिण आफ्रिकेने भारतीय गोलंदाजांना धू धू धुतलं
गुजरात टायटन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) त्याच्या संघाच्या पदार्पणासोबतच स्वतः देखील कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. गेल्या हंगामापर्यंत तो मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा भाग होता. मात्र आता कर्णधार पदाच्या इनिंगमध्ये त्याला पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) त्याच्या संघाला यशस्वी बनवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करेल. पंजाब किंग्जकडून खेळताना त्याने बॅटने चांगली कामगिरी केली होती. मात्र संघाची कामगिरी फारशी चांगली झाली नाव्हती. त्यामुळे आता अंतिम फेरी गाठण्यासाठी के एल राहूल नवा संघ आणि नव्या जोशात मैदानात उतरेल.
या सामन्यादरम्यान, ड्रीम 11 वर टीम (Dream11 Team) बनवण्याची आवड असलेल्या चाहत्यांसाठी एक परिपूर्ण संघ बनवण्याचे आव्हान असेल. ही टीम तयार करण्यासाठी आम्ही तुम्हाला आमचा सल्ला देत आहोत. याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स Dream11टीम (GT vs LSG Dream11 Team Prediction)
कर्णधार : हार्दिक पंड्या
उपकर्णधार: मनीष पांडे
फलंदाज: केएल राहुल, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, एविन लुईस
यष्टिरक्षक: क्विंटन डी कॉक
अष्टपैलू: कृणाल पांड्या, दीपक हुडा
गोलंदाज: मोहम्मद शमी, राशिद खान
गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संभाव्य संघ (GT vs LSG Probable-XI)
लखनऊ सुपर जायंट्स संभाव्य-11 : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, कृणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम, दुष्मंत चमीरा, अंकित राजपूत, आवेश खान, रवी बिश्नोई.
गुजरात टायटन्स संभाव्य-11 : शुभमन गिल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या (कर्णधार), राहुल तेवतिया, वरुण आरोन, रशीद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन.