Top Recommended Stories

IPL 2022 GT vs LSG : रोमांचक सामन्यात हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सचा विजय, लखनऊवर 5 विकेटने मात

IPL 2022 GT vs LSG: इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या मोसमात पहिल्यांदा खेळण्यासाठी उतरलेल्या हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने के एल राहुलच्या लखनऊ सुपर जयंट्सला 5 विकेटने पराभूत करत विजय मिळवला आहे.

Updated: March 29, 2022 12:12 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

IPL 2022 GT vs LSG : रोमांचक सामन्यात हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सचा विजय, लखनऊवर 5 विकेटने मात
IPL 2022 GT vs LSG

IPL 2022 GT vs LSG: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15 व्या मोसमात पहिल्यांदा खेळण्यासाठी उतरलेल्या हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) के एल राहुलच्या (KL Rahul) लखनऊ सुपर जयंट्सला (Lucknow Super Giants) 5 विकेटने पराभूत करत विजय मिळवला आहे. वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळल्या गेलेल्या चौथ्या लीग सामन्यात सुरुवातीला फलंदाजी करताना लखनऊने 20 षटकात 6 गडी गमावून 158 धावा केल्या. त्यानंतर गुजरातने 19.4 षटकांत 5 गडी राखून एलएसजीने दिलेले लक्ष्य गाठले.

You may like to read

पावर प्लेमध्ये 3 महत्त्वाच्या विकेट घेणारा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. शमीने कर्णधार केएल राहुलला डावाच्या पहिल्या चेंडूवर बाद करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. शमीचा आऊट स्विंग बॉल राहुलच्या बॅटला लागला आणि यष्टिरक्षक मॅथ्यू वेडच्या हातात गेला. ऑनफिल्ड अंपायरने राहुलला नाबाद दिले. यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिकने डीआरएस घेतला. रिव्ह्यूमध्ये राहुल बाद झाला. यानंतर शमीने क्विटन डिकॉक आणि मनिष पांडेची महत्त्वाची विकेट घेऊन गुजरात टायटन्सचा डाव मजबूत केला.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेव्हिड मिलर, विजय शंकर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्यून, वरुण एरॉन आणि मोहम्मद शमी.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कर्णधार), क्विटंन डी कॉक, एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुड्डा, क्रृणाल पंड्या, आयुष बडोनी, रवी बिश्नोई, आवेश खान, दुष्मंता चमीरा आणि मोहसिन खान.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.