Top Recommended Stories

live

GT vs RR Final IPL 2022: गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्याच हंगामात मिळवले विजेतेपद, राजस्थानचा 7 विकेटने पराभव

GT vs RR Final IPL 2022: IPL 2022 च्या विजेतेपदाच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून मोठा विजय नोंदवला. आयपीएलच्या इतिहासात जेतेपद पटकावणारी गुजरात सातवी फ्रँचायझी ठरली आहे. शुभमन गिलने विजयी षटकार ठोकून गुजरातला विजय मिळवून दिला.

Updated: May 30, 2022 12:06 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

GT vs RR Final IPL 2022: गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्याच हंगामात मिळवले विजेतेपद, राजस्थानचा 7 विकेटने पराभव
GT vs RR Final IPL 2022

Live Score GT vs RR Final IPL 2022: IPL 2022 च्या विजेतेपदाच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून मोठा विजय नोंदवला. आयपीएलच्या इतिहासात जेतेपद पटकावणारी गुजरात सातवी फ्रँचायझी ठरली आहे. शुभमन गिलने विजयी षटकार ठोकून गुजरातला विजय मिळवून दिला. कर्णधार हार्दिक पंड्या सामन्याचा हिरो ठरला. आधी गोलंदाजीत त्याने तीन बळी घेतले आणि नंतर फलंदाजी करताना बॅटमधून 30 चेंडूत 34 धावांची खेळी केली.

Also Read:

हार्दिक पांड्याच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान संघ जेतेपदाच्या सामन्यात केवळ नऊ गडी गमावून केवळ 130 धावा करू शकला. हार्दिकच्या झंझावातासमोर राजस्थानचे सर्व मोठे फलंदाज फ्लॉप ठरले. त्याने प्रथम संजू सॅमसनला झेलबाद केले. यानंतर लगेचच जोस बटलरलाही 39 धावांवर बाद केले. शिमरॉन हेटमायर मधल्या फळीत राजस्थानच्या धावांचा वेग वाढवेल अशी अपेक्षा होती पण हार्दिकने त्याचीही विकेट घेतली. डावाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शमीने रियान परागला बोल्ड केले. साई किशोरनेही दोन गडी बाद केले.

आयपीएलच्या या हंगामात पहिल्यांदा उतरलेला आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करून फायनलपर्यंत धडक मारणारा गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील या संघाने शानदार खेळी करत आयपीएल 2022 ची ट्रॉफी उंचावली. दुसरीकडे आयपीएलच्या इतिहासात राजस्थानने दुसऱ्यांदा अंतिम फेरीत (IPL 2022 Final) धडक मारली होती. याआधी या संघाने 2008 मध्ये एकमेव अंतिम सामना खेळला होता. त्यावेळी या संघाने पहिले विजेतेपद पटकावले होते.

समारोप समारंभ

उद्घाटन सोहळ्यात रवी शास्त्री मंचावर सुत्रसंचालन करताना दिसले. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या चित्रपटांच्या गाण्यांव्यतिरिक्त साऊथचा सुपरहिट चित्रपट RRR मधील ‘नाचो…नाचो…नाचो’ गाण्यावर डान्स करताना दिसला. KGF चित्रपटाचा प्रसिद्ध डायलॉग ‘व्हायलेंस लाईक्स मी’ रणवीरने ठोकला, तेव्हा चाहत्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळाली. रणवीरनंतर आता प्रसिद्ध गायक आणि संगीतकार एआर रहमान यांनी देखील आयपीएलच्या स्टेजवर धमाकेदार परफॉर्म केला. ‘मां तुझे सलाम…’ने सुरुवात केल्यानंतर एआर रहमान यांनी ‘जय हो…’ गान्यावर देखील लाइव्ह परफॉर्मन्स केला.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन: जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, आर अश्विन, रविचंद्रन अश्विन, ओबेद मॅकॉय, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन: शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीप), मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, यशवंत दयाल, साई किशोर.

Live Updates

 • 11:47 PM IST

  गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्याच हंगात मिळवले विजेतेपद, राजस्थानचा 7 विकेटने पराभव

 • 11:26 PM IST

  युझवेंद्र चहलने घेतली तिसरी विकेट, हार्दिक पांड्या 34 धावा करून बाद

 • 9:31 PM IST

  गुजरातची सामन्यावर पकड, 98 च्या स्कोअरवर राजस्थानचे 6 फलंदाज माघारी

 • 9:28 PM IST

  बटलर पाठोपाठ हेटमायर देखील माघारी, हार्दिक पांड्याने तिसरी दूसरी विकेट

 • 9:23 PM IST

  जोस बटलर 39 धावा करून बाद झाला, हार्दिकपांड्याने घेतली दूसरी विकेट

 • 8:50 PM IST

  राजस्थानला दुसरा मोठा झटका, कर्णधार संजू सॅमसन 14 धावा करून बाद, 9व्या षटकात हार्दिक पांड्याच्या दूसऱ्या चेंडूवर संजू झेलबाद.

 • 8:39 PM IST

  राजस्थानची संयमी सुरुवात, पावरप्लेमध्ये एक विकेट गमवून केल्या 45 धावा

 • 8:38 PM IST

  षटकार ठोकल्यानंतर यशस्वी जैस्वाल झेलबाद, गुजरातला मिळाली पहिली विकेट, यशस्वी जैस्वाल 16 चेंडूत 22 धावा करून बाद झाला.

 • 7:47 PM IST

  गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन: शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीप), मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, यशवंत दयाल, साई किशोर.

 • 7:47 PM IST

  राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन: जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, आर अश्विन, रविचंद्रन अश्विन, ओबेद मॅकॉय, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या