By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Video: 'श्रीवल्ली' गाण्यावर Hardik Pandyaने आजीसोबत केला जबरदस्त डान्स, Allu Arjun म्हणाला…
Hardik Panday Dance Video : आपल्या आजीसोबत श्रीवल्ली गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ हार्दिक पांड्यानेआपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

Hardik Panday Dance Video : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (South Superstar Allu Arjun) ‘पुष्पा द राईज’ चित्रपट (Pushpa Movie) नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. या चित्रपटातील डायलॉग्स तर खूपच फेमस झाले आहेत. त्याचसोबत या चित्रपटातील गाण्यांनी तर सर्वांना अशरश: वेड लावलं आहे. सोशल मीडियावर (Social Media) तर या चित्रपटातील डायलॉग्स आणि गाण्यांनी चांगलाच ट्रेंड तयार केला आहे. अनेक जण ‘श्रीवल्ली’ गाण्याचा व्हिडिओ (Srivalli Song Video) तयार करुन ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. टीम इंडियाचा (Tema India) अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) देखील यात मागे राहिला नाही. हार्दिकला सुद्धा श्रीवल्ली गाणं प्रचंड आवडलं असून त्याने आपल्या आजीसोबत या गाण्यावर व्हिडिओ तयार केला आहे.
View this post on Instagram
आपल्या आजीसोबत श्रीवल्ली गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ हार्दिक पांड्याने (Hardik Pandya Dance Video) आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Video) पोस्ट केला आहे. हार्दिक पांड्या आणि त्यांच्या आजीचा हा जबरदस्त डान्स त्याच्या चाहत्यांना आणि नेटिझन्सला प्रचंड आवडला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. हार्दिकने हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘आमची पुष्पा’, ‘आजी’, असे लिहिले आहे. हार्दिकच्या या व्हिडिओला त्याच्या चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. त्याचसोबत हा व्हिडिओ पाहून अल्लू अर्जुनने देखील कमेंट केली आहे. ‘खूपच छान.. आजीला माझे खूप सारे प्रेम’, अशी कमेंट अल्लू अर्जुनने केली आहे.
दरम्यान, अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा ‘चित्रपट डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील गाण्याने सर्वांना अक्षरश: नाचायला भाग पाडले. प्रत्येक जण या गाण्यातील अल्लू अर्जुनची स्टाईल करत व्हिडिओ तयार करुन ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या कामात टीम इंडियाचे क्रिकेटपटू देखील मागे राहिले नाहीत. सर्वात आधी रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) इन्स्टाग्रामवर रील्स तयार करुन हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) , सुरेश रैना (Suresh Raina) यांनी देखील श्रीवल्ली गाण्यावर व्हिडिओ तयार केला. आता हार्दिक पांड्याने आजीसोबत श्रीवल्ली गाण्यावर व्हिडिओ शेअर केला. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनाही या गाण्याने वेड लावले आहे. डेव्हिड वॉर्नर, ड्वेन ब्राव्हो यांनी देखील या गाण्यावर व्हिडिओ तयार केले आहेत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या