मुंबई : देशात कोरोना विषाणूच्या (corona virus) वाढत्या केसेसमुळं आगामी टी-20 विश्वचषक (T20 World Cup) भारताऐवजी युएईमध्ये होण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी शनिवारी दिली आहे. (hosting of T20 World Cup in UAE instead of India; BCCI Secretary Jai Shah)Also Read - IND vs ENG : टीम इंडियाला धक्का, रोहित शर्मा कसोटीतून बाहेर, जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपद

एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये जय शाह (Jay Shah) म्हणाले की, “आपल्या देशात कोविड19 (COVID-19) परिस्थितीमुळे आम्हाला स्पर्धा युएईमध्ये (UAE) हलवावी लागू शकते. आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. खेळाडूंची सुरक्षितता आणि आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. आम्ही लवकरच या संदर्भात अंतिम निर्णय घेऊ “. Also Read - COVID-19 Vaccine : मोठा निर्णय! आता कोणत्याही वयोगटातील नागरिकांना मिळणार लस, देशातील पहिल्या m-RNA लसला मंजुरी

बीसीसीआयने (BCCI) या आधीच कोरोना संकटामुळं इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील (IPL2021) उर्वरित सामन्यांचे आयोजन युएईमध्ये (UAE)करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता टी-20 वर्ल्डकप देखील यूएईमध्येच होण्याची शक्यता आहे. आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन 19 सप्टेंबर 2021 पासून 15 ऑक्टोबर 2021 दरम्यान करण्यात आले आहे. (hosting of T20 World Cup in UAE instead of India; BCCI Secretary Jai Shah) Also Read - Rohit Sharma Daughter Video : रोहित शर्माच्या मुलीने बोबडे बोलत दिली वडिलांच्या तब्बेतीची अपडेट, व्हिडिओ झाला व्हायरल

याचाच अर्थ असा की, टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यानंतर लगेचच होणार आहे. त्यामुळं आयपीएलमधील संघांच्या फ्रेंचायजिजना (Franchise) या स्पर्धेत विदेशी खेळाडूंना सहभागी होता येणार नाही, अशी भीती आहे.

एएनआयशी बोलताना एका फ्रेंचाइजीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “स्पर्धा सुरू होण्याआधी युएईला जाणे महत्त्वाचे ठरेल. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत परिस्थिती वेगळी आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात हॉटेल बुकिंग करण्यास अडचण येऊ शकते”.

ते म्हणाले की, “सरकार आणि बीसीसीआयची परवानगी घेतल्यानंतर 6 जुलैपर्यंत आम्ही युएईला जाण्याचा विचार करीत आहोत. गेल्या वर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात बुकिंग करणे सोपे नसेल. तसेच यावेळी बायो बबलचे नियमही अधिक कठोर झाले आहेत. ”(hosting of T20 World Cup in UAE instead of India; BCCI Secretary Jai Shah)