मी तुझ्या डोळ्यात अश्रू पाहिले... Virat Kohli च्या राजीनाम्यानंतर Anushka Sharma ची भावूक पोस्ट
विराटच्या राजीनाम्याने एकीकडे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे पत्नी अनुष्का शर्माने या दिग्गज खेळाडूच्या नावाने भावनिक संदेश लिहिला आहे. या चिठ्ठीत तिने महेंद्रसिंग धोनीच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

Anushka Sharma’s emotional post after Virat Kohli’s resignation : विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. भारताच्या सर्वात यशस्वी कसोटी कर्णधाराच्या (Test captain) या निर्णयाने सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विराटच्या राजीनाम्याने (Virat’s Resignation) एकीकडे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) या दिग्गज खेळाडूच्या नावाने भावनिक संदेश लिहिला आहे. या चिठ्ठीत तिने महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नावाचाही उल्लेख केला आहे. (I saw tears in your eyes … Anushka Sharma’s emotional post after Virat Kohli’s resignation)
Also Read:
पोस्टमध्ये अनुष्काने केला महेंद्रसिंग धोनीचा उल्लेख
अनुष्का शर्माने सोशल मीडियावर पोस्ट (Anushka Sharma social media post) शेअर करताना लिहिले की “मला 2014 मध्ये तो दिवस आठवतो जेव्हा तू मला सांगितले होते की तुला कर्णधार बनवण्यात आले आहे कारण एमएसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला आठवतंय, एमस (धोनी), तू आणि मी त्या दिवशी नंतर गप्पा मारत होतो आणि त्याने तुझी दाढी किती लवकर पांढरी होईल अशी गंमत केली होती. यावर आम्ही सगळे खूप हसलो.”
‘मला तुझा अभिमान वाटतो’
अनुष्का शर्माने पुढे लिहिले की “त्या दिवसापासून मी तुझी दाढी पांढरी होण्याबरोबर खूप काही पाहिले आहे. मी तुझी ग्रोथ पाहिली, तुझ्या आजूबाजूला आणि तुझ्या आत. आणि हो, भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून तुझा विकास आणि तुझ्या नेतृत्वाखाली संघाने केलेल्या कामगिरीचा मला खूप अभिमान आहे. पण तू स्वतःमध्ये जी ग्रोथ साधली आहेस त्याचा मला जास्त अभिमान वाटतो.”
शेवटी मुलीसाठी लिहिली ही गोष्ट
अनुष्काने पुढे लिहिले “तुझ्या पराभवानंतर मी तुझ्या शेजारी बसायचे आणि तुझ्या डोळ्यात अश्रू आसायचे. तेव्हा तू विचार करायचा की अजून काही तुम्ही करू शकलो असतो का? तू लोभापोटी काही केले नाही, हे पद सुद्धा घेतले नाही आणि मला हे माहित आहे. आपली मुलगी या 7 वर्षांतील धडे तिच्या वडिलांकडून घेईल, जो तू तिच्यासाठी आहेस. तू चांगलं केलंस.”
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या