By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
ICC Announced T20 World Cup schedule: टी-20 विश्वचषकाचे आयसीसीने वेळापत्रक केले जाहीर; असे खेळले जाणार सामने
ICC Announced T20 World Cup schedule: टी20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया 23 ऑक्टोबरपासून आपल्या अभियानाला सुरुवात करणारा असून टीम इंडियाचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे.

ICC Announced T20 World Cup schedule : यंदाच्या टी -20 विश्वचषकासाठी (T-20 World Cup) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वेळापत्रक जाहीर केले आहे. टी -20 विश्वचषकासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पार पडणाऱ्या या स्पर्धेत भारत (Team India), पाकिस्तान (Team Pakistan), दक्षिण आफ्रिका (Team South Africa), बांगलादेश (Team Bangladesh), इंग्लंड (Team England), न्यूझीलंड (Team New Zealand), ऑस्ट्रेलिया (Team Australia), अफगानिस्तान (Team Afghanistan) हे संघ आधीच पात्र ठरले आहेत तर श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड हे चार संघ 16 ऑक्टोबरपासून पात्र ठरण्यासाठी खेळतील. यामधून निवडलेल्या 2 संघांना सुपर 12 मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.
टीम इंडियाचा पहिला सामना होईल पाकिस्तानशी –
टी20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया 23 ऑक्टोबरपासून आपल्या अभियानाला सुरुवात करणारा असून टीम इंडियाचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. 23 ऑक्टोबरला मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होईल. याआधी 2021 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान भिडले होते. यात पाकिस्तानने भारताला पराभूत केलं होत.
असे होतील टीम इंडियाचे सामने –
– मेलबर्न येथे 23 ऑक्टोबरला भारत विरुध्द्व पाकिस्तान
– सिडनी येथे 27 ऑक्टोबरला भारत विरुध्द्व ए रनर-अप संघ
– पर्थ येथे 30 ऑक्टोबरला भारत विरुध्द्व साऊथ आफ्रिका
– एडिलेड येथे 2 नोव्हेंबरला भारत विरुध्द्व बांगलादेश
– मेलबर्न येथे 6 नोव्हेंबरला भारत विरुध्द्व ग्रुप बी विजेता संघ
Trending Now
वरीलप्रमाणे सामने होणार असून टीम इंडियाला पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि अन्य दोन क्वालिफायर टीमसह ग्रुप-2 मध्ये ठेवले आहे. तर ग्रुप -1 मध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान आणि अन्य दोन क्वालिफायर टीम असे ग्रुप पाडण्यात आले आहे.
13 नोव्हेंबरला मेलबर्नच्या मैदानावर होणार फायनल –
टी20 विश्वचषकाचे सामने ब्रिस्बेन, एडिलेड, जिलोन्ग, हॉबर्ट, मेलबर्न, पर्थ, आणि सिडनी या ठिकाणी होणार आहे. उपांत्य सामने 9 व 10 नोव्हेंबर रोजी तर अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळाला जाणार आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या