मुंबई: टी-20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. भारत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध हाय व्होल्टेज सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. टी20 क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अगदी काही दिवस आधी भारतीय स्कॉडमध्ये (Team India squad) बदल करण्यात आले आहेत. अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी 15 जणांच्या संघात अष्टपैलू शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्वतः एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. अक्षर पटेलचे नाव आता स्टँड बाय खेळाडूंच्या लिस्टमध्ये समाविष्ट झाले आहे.Also Read - T20 World Cup 2021 आधी आयसीसीचा मोठा निर्णय; हा नवा नियम वाढवणार सामन्याचा रोमांच

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले की, “अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने संघ व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर शार्दुल ठाकूरला मुख्य संघात समाविष्ट केले आहे. अष्टपैलू अक्षर पटेल 15 सदस्यीय संघाचा भाग होता पण आता त्याला ‘स्टँड-बाय’ खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे”. Also Read - BREAKING: IPL मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, हैदराबाद संघाचा क्रिकेटपटू पॉझिटिव्ह

काही क्रिकेटपटूंना दुबईमध्ये संघाच्या बायो बबलमध्ये राहण्यास आणि भारतीय संघाला तयारीमध्ये मदत करण्यास सांगण्यात आले आहे. या खेळाडूंमध्ये आवेश खान, उम्रान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मेरीवाला, व्यंकटेश अय्यर, करण शर्मा, शाहबाज अहमद आणि के. गौतम यांचा समावेश आहे. Also Read - Coronavirus: BCCI ची मोठी घोषणा, क्रिकेटपटूंसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

शार्दुल ठाकूरच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीवर एक नजर
शार्दुल ठाकूरने भारतासाठी 4 कसोटी सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत तर त्याच्याकडे 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये 22 विकेट्स आहेत. जर टी-20 सामन्यांबद्दल विचार केला तर शार्दुल ठाकूरने 22 सामन्यात 31 विकेट्स घेतल्या आहेत. शार्दुल ठाकूरने भारतासाठी कसोटीत 3 अर्धशतकांच्या मदतीने 190 धावा केल्या आहेत तर एकदिवसीय सामन्यात 107 धावा केल्या. शार्दुलने भारतासाठी टी-20 फॉर्मॅटमध्ये 69 धावा केल्या आहेत.

दरम्यान, टी 20 विश्वचषक 2021 ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. पहिल्या फेरीत आठ संघ स्पर्धा करतील ज्यात श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश आहे. आयर्लंड, नेदरलँड्स आणि नामिबिया ग्रुप ए मध्ये श्रीलंकेमध्ये सामील आहेत, तर ओमान, पीएनजी आणि स्कॉटलंड ब गटात बांगलादेशचा सामना करतील. तर उर्वरित सहा संघ आयसीसी टी-20 विश्वचषक पात्रता फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

ICC T20 World Cup, India Squad: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, सूर्य कुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती , जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी. स्टँडबाय खेळाडू: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर.