Under 19 world Cup मध्ये विराट कोहलीने 'क्विक बॉलर' अशी करून दिली होती स्वतःची ओळख
Under 19 world Cup: अंडर 19 वर्ल्ड कपमधील (Under 19 world Cup) अंतिम लढत भारतविरुद्ध इंग्लंड (India vs England) अशी खेळली जात आहे. भारताची अंडर-19 क्रिकेट टीम जिंकण्याच्या इराऱ्याने मैदानात उतरली आहे. टीम इंडिया ( Team India) हा सामना जिंकला तर यश ढूल (Yash Dhull) हा विश्वचषक जिंकणारा 5 वा भारतीय कर्णधार (Indian Captain) ठरेल.

Under 19 world Cup: अंडर 19 वर्ल्ड कपमधील (Under 19 world Cup) अंतिम लढत भारतविरुद्ध इंग्लंड (India vs England) अशी खेळली जात आहे. भारताची अंडर-19 क्रिकेट टीम जिंकण्याच्या इराऱ्याने मैदानात उतरली आहे. टीम इंडिया ( Team India) हा सामना जिंकला तर यश ढूल (Yash Dhull) हा विश्वचषक जिंकणारा 5 वा भारतीय कर्णधार (Indian Captain) ठरेल. भारताने सन 2000 मध्ये मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) यांच्या नेतृत्त्वात पहिला विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2008 मध्ये विराट कोहली (Virat Kohli) यांच्या कॅप्टनशीपमध्ये, 2012 मध्ये उन्मुक्त चंद (unmukt Chand) आणि 2018 मध्ये पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) नेतृत्त्वात भारताने अंडर 19 वर्ल्ड काप जिंकला होता.
Also Read:
विराटने ‘क्विक बॉलर’ अशी स्वतःची करून दिली ओळख
अंडर 19 नंतर विराट कोहली याला सीनियर टीमचे कर्णधारपद देण्यात आले. ही जबाबदारी देखील त्याने यशस्वीरित्या सांभाळली. अशातच त्याचा 14 वर्षे जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात विराट कोहली स्वतःची ओळख ‘राईट आर्म क्विक बॉलर’ अशी करून दिली होती. हा व्हिडीओ अंडर-19 वर्ल्ड कप 2008 चा आहे. या शॉर्ट क्लिपमध्ये हा खेळाडू म्हणतो आहे की, ‘विराट कोहली.. कप्तान.. उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज, उजव्या हाताचा जलद गोलंदाज (क्विक बॉलर) आणि माझा आवडता क्रिकेटर आहे हर्षल गिब्ज’
विराटच्या या व्हिडिओला फॅन्स फनी व्हिडीओ असे संबोधत आहेत. मात्र, विराटच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्ड कपचा दुसरा किताब जिंकला होता. त्यानंतर विराटने आपला पूर्ण फोकस खेळावर केला होता. त्यामुळे त्याने आतापर्यंत अनेक उंच शिखर गाठले आहे.
Remember how your favourite superstars looked like as teenagers? 👦
Presenting the 2008 U19 @cricketworldcup introductions 📽️
Which one’s your favourite? 😄 pic.twitter.com/Sk4wnu4BNs
— ICC (@ICC) November 4, 2020
भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार
विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला आहे. त्याने आपल्या नेतृत्त्वात टीम इंडियाला 68 पैकी 40 टेस्ट सामन्यात विजय मिळवून दिला आहे. विराट हा जगातील तिसरा यशस्वी कसोटी कर्णधार आहे. या बाबतीत त्याच्या पुढे स्टीव वा (Steve Waugh ) आणि रिकी पॉन्टिंग ( Ricky Ponting ) यांचे नाव येते. स्टीव्ह वाने आपल्या नेतृत्त्वात 57 पैकी 41 टेस्ट सामने जिंकले. तर रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियाने 77 पैकी 48 कसोटी सामने जिंकले आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणारा तिसरा फलंदाज
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक शतक करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली हा तिसऱ्या स्थानी येतो. कोहलीचे आतापर्यत 70 शतके झाली आहे. तर रिकी पॉन्टिंग 71 शतकांसह दुसऱ्या स्थावर आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा 100 शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे.