
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाला 5वा आणि शेवटचा (Team India) कसोटी सामना सुरू होण्यापूर्वीच आणखी एक धक्का बसला आहे. सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एजबॅस्टन कसोटीतून बाहेर पडला आहे. याआधी त्याचा सहकारी सलामीवीर आणि संघाचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) हा स्नायूंच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून आणि या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्द कसोटी सामन्यातून भारताला दोन्ही प्रमुख सलामीवीरांशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे.
रोहित शर्मा नियोजित कसोटी सामन्यातही खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. इंग्लंडमधील लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान रोहितला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून तो क्वारंटाईनमध्ये आहे. आता रोहितच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतीच भारतीय खेळाडूंसोबत टीम मॅनेजमेंटची बैठक पार पडली आहे. या बैठकीत जसप्रीत बुमराहही उपस्थित होता. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीबद्दल सर्व खेळाडूंना कळवण्यात आले असून बुमराह संघाची धुरा सांभाळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Rohit Sharma will miss the fifth test (against England) and Jasprit Bumrah will lead the Indian side. He has been informed about this in the team meeting: Sources
(File Pic) pic.twitter.com/AvJRstH6Lq
— ANI (@ANI) June 29, 2022
भारतीय निवडकर्त्यांनी या दौऱ्यासाठी यापूर्वी कोणत्याही अतिरिक्त सलामीच्या फलंदाजाची निवड केली नव्हती. परंतु सोमवारी रोहितच्या अनुपस्थितीच्या शक्यता निर्माण झाल्यानंतर निवडकर्त्यांनी मयंक अग्रवालला बॅकअप सलामीवीर म्हणून भारतीय संघात सामील होण्यासाठी पाठवले आहे. आता मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल ही जोडी भारतासाठी डावाची सुरुवात करताना दिसण्याची शक्यता आहे.
तत्त्पूर्वी बुधवारी रोहितचा नवीन कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु खबरदारी म्हणून त्याला या कसोटीतून बाहेर ठेवले जात आहे. याआधी आज असे वृत्त होते की निवड समितीचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा आज एजबॅस्टन येथे रोहितच्या प्रकृतीबद्दल आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी आगामी कसोटी सामन्याच्या रणनीतीवर चर्चा करणार आहेत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या