साऊथम्पट : सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताच्या दुसऱ्या डावाची दमदार सुरुवात केली. मात्र टिम साऊदीने शुबमन गिलला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. शुबमन गिल 8 धावांवर पायचित झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. रोहित आणि चेतेश्वरने पुजाराने भारताची धावसंख्या अर्धशतकाच्या पार नेली. मात्र पुन्हा एकदा टिम साऊदीने भारताला दुसरा धक्का दिला. रोहित शर्मा 30 धावांची खेळी करून तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार विराट आणि चेतेश्वर पाचवा दिवस संपेपर्यंत नाबाद राहिले आहेत. विराट 8 तर चेतेश्वर पुजारा 12 धावांवर नाबाद आहे. भारताची धावसंख्या दोन बाद 64 पर्यंत पोहोचली आहे.Also Read - ICC Announced T20 World Cup schedule: टी-20 विश्वचषकाचे आयसीसीने वेळापत्रक केले जाहीर; असे खेळले जाणार सामने

भारत (प्लेइंग XI): रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह. Also Read - IND vs SA 3rd Test : DRS वादानंतर ICC ने उचललं महत्त्वाचं पाऊल, टीम इंडियाला दिला इशारा

न्यूझीलंड (प्लेइंग XI): टॉम लॅथम, डेवॉन कॉन्वे, केन विलियमसन (कर्मधार), रॉस टेलर, हेनरी निकोलस, बीजे वॉटलिंग (यष्टीरक्षक), कॉलिन डी ग्रँडहोम, काइल जॅमीसन, नील वॅगनर, टिम साउथी, ट्रेंट बोल्ट. Also Read - IND vs NZ: टीम इंडियासमोर किवींची शरणागती,  मोठा विजय मिळवत मालिकेत 1-0 नं घेतली आघाडी

Live Updates