IND vs SA, 3rd Test: केपटाऊन कसोटीत खेळणार कर्णधार विराट कोहली, मोहम्मद सिराजच्या फिटनेसबाबत केला खुलासा

सेंच्युरियन येथील पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. कोहलीला अजूनही दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर टीम इंडियासाठी पहिली कसोटी मालिका जिंकून देणारा कर्णधार बनण्याची संधी आहे.

Published: January 10, 2022 4:40 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

King Kohli, Virat Kohli injury, Ajinkya Rahane, Ajinkya Rahane news, Ajinkya Rahane age, Ajinkya Rahane records, Virat Kohli comeback, Ravi Ashwin wickets, Hanuma Vihari, Hanuma Vihari news, Hanuma Vihari age, Gautam Gambhir, Gautam Gambhir News, Gautam Gambhir updates, Virat Kohli, Virat Kohli news, Virat Kohli age, Virat Kohli updates, Virat Kohli records, India's Predicted XI, India's Probable XI, India 11 For 3rd Test, Cape Town Test, India XI For 3rd Test, Team India News, Cape Town live, Team India Playing XI, Ind vs SA 3rd Test, Cape Town Test, SA vs Ind 3rd Test, India tour of South Africa 2021-22, India tour of South Africa 2021-22 schedule, India tour of South Africa 2021-22 news, India tour of South Africa 2021-22 updates, India tour of South Africa 2021-22 squads, Cricket News, Omicron, Coronavirus, Covid, Omicron in South Africa, Team India, CSA.
IND vs SA, 3rd Test Captain Virat Kohli to play Cape Town Test

India vs South Africa, 3rd Test: भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) 11 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात खेळणार असल्याची घोषणा सोमवारी पत्रकार परिषदेत केली. मात्र वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) केपटाऊन कसोटीत खेळू शकणार नसल्याच्या वृत्तालाही कोहलीने दुजोरा दुजोरा दिला. विराट कोहलीने आपण 100 टक्के तंदुरुस्त असल्याचे सांगितले. तसेच “सिराज अजूनही सामन्यासाठी किंवा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी तयार नाही”, अशी माहिती देखील यावेळी पत्रकारांशी बोलताना कोहलीने दिली.

Also Read:

आपल्या फिटनेससाठी ओळखला जाणारा किंग कोहली जोहान्सबर्ग येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाठीच्या दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने हा सामना 7 विकेटने गमावला. सेंच्युरियन येथील पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. कोहलीला अजूनही दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर टीम इंडियासाठी पहिली कसोटी मालिका जिंकून देणारा कर्णधार बनण्याची संधी आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान कोहलीने सांगितले की जोहान्सबर्गमध्ये खेळू न शकल्यामुळे तो खूप निराश झाला होता. तो म्हणाला “जेव्हा तुम्ही कसोटी सामना गमावता तेव्हा तुम्हाला अपराधी वाटते आणि आपण दुखापतग्रस्त कसे होऊ शकतो असा विचार तुमच्या मनात येतो.”

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत तिसरा कसोटी सामना मंगळवारी 11 जानेवारीपासून न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 02:00 वाजता सुरू होईल. नाणेफेक पहिल्या दिवशी दुपारी 1:30 वाजता होईल.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, विराट कोहली, इशांत शर्मा, उमेश शर्मा, उमेश , जयंत यादव, प्रियांक पांचाळ, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा.

दक्षिण आफ्रिकेचा संघ: डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रस्सी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बावुमा, काइल व्हर्न (विकेटकीपर), मार्को जेन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी, विआन मुल्डर, प्रीनलन सब्रियन , ब्यूरन हेंड्रिक्स, सिसांडा मॅगाला, जॉर्ज लिंडे, सेर्ले एर्व्ही, रायन रिकेल्टन, ग्लेंटन स्टुरमन.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 10, 2022 4:40 PM IST