IND vs SA 3rd Test : DRS वादानंतर ICC ने उचललं महत्त्वाचं पाऊल, टीम इंडियाला दिला इशारा

केपटाऊन कसोटीत डीन एल्गरला नाबाद दिल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याचा राग स्टंप माईकवर काढला. या प्रकरणानंतर टीकाकारांनी विराट कोहलीवर दंडाची मागणी केली होती. काहींनी त्यांच्यावर बंदी घालण्यासही सांगितले.

Published: January 15, 2022 5:57 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

IND vs SA 3rd Test : DRS वादानंतर ICC ने उचललं महत्त्वाचं पाऊल, टीम इंडियाला दिला इशारा
IND vs SA 3rd Test ICC's big decision after DRS controversy, warns Team India

India vs South Africa: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावली असली तरी टीम इंडियाला (Team India) मोठा दिलासा मिळाला आहे. केपटाऊन कसोटीत डीन एल्गरला नाबाद दिल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) त्याचा राग स्टंप माईकवर (Stump Mike) काढला. या प्रकरणानंतर टीकाकारांनी विराट कोहलीवर दंडाची मागणी केली होती. काहींनी त्यांच्यावर बंदी घालण्यासही सांगितले. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) एवढे मोठे पाऊल न उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

Also Read:

आयसीसीने भारतीय संघाला केवळ इशारा देऊन सोडले आहे. कोणत्याही खेळाडूवर कोणताही चार्च लावण्यात आला नाही. हा भारतीय चाहत्यांसाठी मोठा दिलासा आहे. सामना अधिकाऱ्यांनी टीमशी संवाद साधला आहे. परंतु ऑफिशयली कोड ऑफ कंडक्ट (Code of Conduct) तोडल्याचा चार्च लावलेला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील 21व्या षटकात पंचाने रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) चेंडूवर डीन एल्गर (Dean Elgar) बाद असल्याचा निर्णय दिला. मात्र विरोधी संघाच्या फलंदाजाने डीआरएस (DRS) घेतला आणि तिसऱ्या पंचाने त्याला नाबाद दिले.

रिप्लेमध्ये हे स्पष्टपणे दिसत होते की इम्पॅक्ट आणि पिचिंग इन दी लाइन होते. परंतु हॉकायच्या मते चेंडू स्टंपवर आदळत नव्हता. त्यानंतर तिसऱ्या पंचाने एल्गरला नाबाद घोषित केले. यामुळे भारतीय संघातील खेळाडू संतप्त झाले आणि कर्णधार कोहली, उपकर्णधार केएल राहुल आणि ऑफ-स्पिनर आर अश्विन यांनी स्टंप माइकवर दक्षिण आफ्रिकेच्या प्रसारक सुपर स्पोर्ट्सची टिंगल केली.

या प्रसंगानंतर संतप्त विराट कोहली स्टंपच्या माईकजवळ आला आणि म्हणाला “तुमच्या संघावर लक्ष केंद्रित करा. फक्त विरोधी संघावर लक्ष केंद्रित करू नका. प्रत्येक वेळी लोकांना पकडण्याचा प्रयत्न करत असता.” दुसरीकडे रविचंद्रन अश्विन बॉल-ट्रॅकिंग टेक्निकवर कटाक्ष टाकत स्टम्प माइकमध्ये म्हणाला “सुपरस्पोर्टमध्ये तुम्ही जिंकण्यासाठी आणखी चांगले मार्ग शोधले पाहिजेत”.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 15, 2022 5:57 PM IST