IND vs SL, 2nd T20I: मधल्या फळीची दमदार फलंदाजी, भारताचा श्रीलंकेवर 7 गडी राखून विजय
India vs Sri Lanka, 1st T20I Match: अव्वल फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरचे अर्धशतक, संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजासोबतच्या भागीदारीमुळे टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या T20 सामन्यात श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला.

India vs Sri Lanka, 1st T20I Match: अव्वल फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरचे (Shreyas Iyer) अर्धशतक, संजू सॅमसन (Sanju Samson) आणि रवींद्र जडेजासोबतच्या (Ravindra Jadeja) भागीदारीमुळे टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या T20 सामन्यात श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. पहिल्या डावात पाथुम निसांका (75) आणि कर्णधार दासून शनाका (नाबाद 47) यांच्या शानदार खेळीमुळे श्रीलंकेने भारतासमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले होते. श्रीलंकेने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 183 धावा केल्या होत्या.
Also Read:
श्रीलंकेच्या 184 धावांना प्रत्युत्तर देताना श्रेयस अय्यरने 44 चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 74 धावांची नाबाद खेळी खेळली. तर जडेजाने अवघ्या 18 चेंडूत 45 धावा करून संघाला विजयापर्यंत नेले. याशिवाय संजू सॅमसनने (Sanju Samson) 25 चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 39 धावांची खेळी केली.
श्रीलंकेने दिलेल्या 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात थोडी डळमळीत झाली. सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) केवळ एका धावेवर चमीराच्या षटकात क्लीन बोल्ड झाला. तर पहिल्या टी-20 सामन्यात शानदार खेळी करणारा इशान किशन (Ishan Kishan) दुसऱ्या सामन्यात 15 चेंडूत 16 धावा करू शकला. गोलंदाज लाहिरू कुमाराच्या (Lahiru Kumara) षटकात तो झेलबाद झाला. यानंतर श्रेयर अय्यरने संजू सॅमसनसोबत मिळून भारताचा डाव पुढे नेला
इशान किशनपाठोपाठ फलंदाजीला आलेल्या संजू सॅमसनने वेगवान खेळी खेळली. 25 चेंडूत तीन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 39 धावा करून तो लाहिरू कुमाराच्या षटकात झेलबाद झाला. यानंतर आलेल्या रवींद्र जडेजाने अवघ्या 18 चेंडूंत एक षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने नाबाद 45 धावा केल्या.
यादरम्यान श्रेयस अय्यरचे नाबाद अर्धशतक आणि खेळाच्या शेवटी आलेल्या जडेजाने आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर सामना संघाच्या नावावर केला. भारतीय संघाने 17.1 षटकात 3 गडी गमावून 186 धावा केल्या.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या