Top Recommended Stories

IND vs SL T20i Series: श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेआधी भारताला मोठा धक्का, हात फ्रॅक्चरमुळे Suryakumar Yadav बाहेर

IND vs SL T20i Series: Suryakumar Yadav Hairline Fracture in Hand: श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघाला एकामागून एक दुखापतींचा समना करावा लागत आहे. आता युवा फलंदाज सूर्यकुमार यादव देखील दुखापतग्रस्त झाला आहे.

Published: February 23, 2022 10:27 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

IND vs SL T20i Series: श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेआधी भारताला मोठा धक्का, हात फ्रॅक्चरमुळे Suryakumar Yadav बाहेर
Suryakumar Yadav Hairline Fracture in Hand

IND vs SL T20i Series: Suryakumar Yadav Hairline Fracture in Hand: श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी (IND vs SL T20i Series) भारतीय संघाला एकामागून एक दुखापतींचा समना करावा लागत आहे. आता युवा फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) देखील दुखापतग्रस्त झाला आहे. सुर्यकुमारच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्चर (Hairline Fracture in Hand) झाल्याचे सांगितले जात आहे. नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला होते. तो प्लेअर ऑफ द सिरीज (player of the series) ठरला. मात्र गुरुवारपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेपूर्वी तो दुखापतीमुळे संघाबाहेर पडला आहे.

Also Read:

यापूर्वी वेगवान गोलंदाज दीपक चहर देखील संघाबाहेर पडला आहे. दीपक चहरला (Deepak Chahar) विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात पायाच्या स्नायूंच्या ताणामुळे श्रीलंका मालिकेतून बाहेर करण्यात आले होते. त्यानंतर आता सूर्यकुमारच्या हातातील फ्रॅक्चर (Fracture in Hand of Suryakumar Yadav) समोर येताच त्यालाही वैद्यकीय पथकाने पांढऱ्या चेंडूच्या या मालिकेसाठी अनफिट घोषित केले आहे. विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमारला ही दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी केएल राहुल (KL Rahul) देखील हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मर्यादित षटकांच्या मालिकेतून बाहेर आहे.

You may like to read

याशिवाय भारतीय निवड समितीने माजी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) यांना टी-20 मालिकेतून विश्रांती दिली आहे. भारतीय संघाकडे खेळाडूंचा मोठा समूह आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धचे आव्हान पेलताना संघाला कोणतीही अडचण येणार नाही असे तज्ज्ञांचे मत आहे.

भारतीय निवड समितीने अद्याप या दोन खेळाडूंच्या बदलीची घोषणा केलेली नाही. मात्र निवड समिती बुधवारी त्याची घोषणा करू शकते अशी अपेक्षा आहे. श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील मालिकेतील पहिला टी-20 सामना 24 फेब्रुवारी रोजी लखनऊमध्ये खेळला जाणार आहे. तर दुसरा आणि तिसरा सामना 26 आणि 27 फेब्रुवारीला धर्मशाळा येथे होणार आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 23, 2022 10:27 AM IST