IND vs WI: बीसीसीआयचा मोठा निर्णय! स्फोटक फलंदाज शाहरुख खान, साई किशोर यांना टीम इंडियात स्थान
IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी बीसीसीआयने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज शाहरुख खान आणि साई किशोर यांना टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले आहे.

IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी बीसीसीआयने (BCCI) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि साई किशोर (Sai kishore) यांना स्टँड-बॉय फलंदाज म्हणून टीम इंडियामध्ये (Team India) स्थान देण्यात आले आहे. भारतातील कोविड-19 ची परिस्थिती पाहता बोर्ड कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाही. त्यामुळेच त्यांनी या मालिकेसाठी दोन अतिरिक्त स्टँड-बॉय क्रिकेटपटू (stand-boy Players) निवडण्याचे आदेश निवडकर्त्यांना दिले आहे. दोन्ही देशांदरम्यान तीन एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांची (ODIs and T20s) मालिका खेळवली जाणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 6 फेब्रुवारीला खेळवला जाईल.
Also Read:
शाहरुख हार्दीक पांड्यापेक्षा कमी नाही
शाहरुख खान हा हार्दिक पांड्याप्रमाणेच (Hardik Pandya) स्फोटक फलंदाज मानला जातो. तो एक चांगला फिनिशरही आहे. विजय हजारे ट्रॉफी दरम्यान शाहरुखने 186 स्ट्राईक रेटने सर्वाधिक धावा केल्या होत्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या (Syed Mushtaq Ali Trophy) अंतिम सामन्यात त्याने 33 धावांची स्फोटक खेळी खेळून तामिळनाडूला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. तामिळनाडूचा रहिवासी असलेल्या साई किशोरने (Sai kishore) नुकत्याच झालेल्या देशांतर्गत स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली. सय्यद मुश्ताक अलीच्या टॉप-10 विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होता.
रोहित प्रथमच वनडेमध्ये कर्णधार असेल
रोहित शर्मा 6 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या वनडे मालिकेदरम्यान नियमित कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. विराटच्या अनुपस्थितीत त्याने अनेकवेळा भारताचे नेतृत्व केले असले तरी संघाची पूर्णवेळ कमान मिळाल्यानंतर वनडे क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची त्याची ही पहिलीच वेळ असेल.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या