India vs South Africa, 3rd ODI: दीपक चहरचं अर्धशतक व्यर्थ, भारताचा 4 धावांनी पराभव, दक्षिण आफ्रिकेने 3-0 ने जिंकली मालिका
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडेत विराट कोहली, शिखर धवननंतर दीपक चहरच्या धडाकेबाज अर्धशतकानंतरही टीम इंडियाचा 4 धावांनी पराभव झाला. या विजयासह टेम्बा बावुमाच्या संघाने एकदिवसीय मालिका 3-0 ने खिशात घातली.

India vs South Africa, 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडेत विराट कोहली (Virat Kohli), शिखर धवन (Shikar Dhawan) नंतर दीपक चहरच्या (Deepak Chahar) धडाकेबाज अर्धशतकानंतरही टीम इंडियाचा 4 धावांनी पराभव झाला. या विजयासह टेम्बा बावुमाच्या संघाने एकदिवसीय मालिका 3-0 ने खिशात घातली. यजमानांकडून अँडिले फेहलुकवायो (Andile Phehlukwayo) आणि लुंगी एनगिडीने (Lungi Ngidi) प्रत्येकी तीन बळी घेतले.
Also Read:
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 288 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने पाचव्या षटकात पहिली विकेट गमावली. कर्णधार केएल राहुलला वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने झेलबाद केले. पहिली विकेट 18 धावसंख्येवर पडल्यानंतर विराट कोहली आणि शिखर धवन यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 98 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. मात्र 23व्या षटकात अँडिले फेहलुकवायोने खेळ फिरवला.
23 व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर फेहलुकवायोने अर्धशतक झळकावणाऱ्या धवनला कर्णधार बावुमाकरवी झेलबाद केले. धवनने 84 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 65 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर क्रीझवर आलेला नवा फलंदाज ऋषभ पंत षटकाच्या शेवटच्या चेंडूवर खाते न उघडता झेलबाद झाला.
South Africa seal tense win in Cape Town! 🙌
The hosts complete a 3-0 whitewash with a four-run win in the third and final ODI 👏🏻
Watch the series live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions)#SAvIND | https://t.co/u8dAzkQuxt pic.twitter.com/K2Z86eF52p
— ICC (@ICC) January 23, 2022
118 धावांवर तीन विकेट पडल्यानंतर कोहलीने एका टोकाकडून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला मात्र 32 व्या षटकात तो फिरकी गोलंदाज केशव महाराजचाही बळी ठरला. कोहली बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर (26) आणि सूर्यकुमार यादव (39) यांनी चांगली कामगिरी केली पण ते जास्त वेळ क्रीजवर टिकले नाहीत.
223 धावांवर सात विकेट अशी अवस्था असताना अष्टपैलू दीपक चहरने एकतर्फी खेळी खेळून भारताला विजयाची आशा निर्माण केली. चहरने 31 चेंडूत आपले दुसरे एकदिवसीय अर्धशतक झळकावून भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या. परंतु भारत विजयाच्या जवळ आहे असं वाटत असताना 48 व्या षटकात लुंगी एनगिडीच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चहर बाद झाला आणि येथून सामना पुन्हा पलटला.
49व्या षटकात फेहलुकवायोच्या तिसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहला बाद करत यजमानांनी पुन्हा एकदा सामन्यावर पकड मिळवली. 49 षटकांनंतर भारताला विजयासाठी 6 धावांची गरज होती आणि बावुमाने चेंडू प्रिटोरियसकडे सोपवला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर युझवेंद्र चहल हवेत चेंडू मारून झेलबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने सामना चार विकेटने जिंकला.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या