कोलंबो : श्रीलंकेविरुद्ध वन डे मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-20 मालिकेचीही दमदार सुरू वात केली आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी करत भराताने श्रीलंकेला धुळ चारली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी उल्लेखणीय राहिली. टी-20 मालिकेत आता भारतीय संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता 27 जुलै रोजी (मंगळवारी) होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळून वन डे पाठोपाठ टी-20 मालिकाही ताब्यात घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. तर दुसरीकडे वन डे मालिका गमावल्यानंतर टी-20 मालिका वाचवण्याच्या इराद्याने श्रीलंकेचा संघ मैदानात उतरेल.Also Read - India vs Sri Lanka: युजवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम कोरोना पॉझिटिव्ह, BCCI नं केला मोठा खुलासा

दुसरा टी-20 सामना कसा पाहाल?

भारत विरुद्ध श्रीलंका (India Vs Shri Lanka 1st T20I) टी-20 मालिकेचे प्रसारण भारतात ‘सोनी स्पोर्ट-2’ करत आहे. मालिकेचा दुसरा टी-20 सामना सोनी टेन-2 आणि सोनी टेन-2 एचडी चॅनेलवर पाहता येईल. Also Read - India vs Sri Lanka 2nd T20 LIVE: रोमांचक सामन्यात श्रीलंकेची भारतावर 4 विकेटनी मात; मालिकेत 1-1 ने बरोबरी

दुसऱ्या टी-20 सामन्याचे लाइव स्ट्रीमिंग

भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या टी-20 सामन्याचे थेट प्रक्षेपण ‘सोनी लिव्ह’ अॅपवर पाहता येईल. Also Read - क्रुणाल पंड्यानंतर Shikhar Dhawan ला देखील कोरोनाची लागण! कोण करणार संघांच नेतृत्व?

दुसरा टी-20 सामना केव्हा आणि कोठे खेळला जाईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना 27 जुलै रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर रात्री 8 वाजता सुरू होईल.

भारताचे टी-20 मालिकेसाठी संपूर्ण पथक (India squad for T20I series against Sri Lanka)

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पाडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, राहुल चाहर, के. गौतम, क्रुणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उप-कर्णधार), दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज : ईशान पोरेल, संदीप वारियर, अर्शदीप सिंह, साई किशोर आणि सिमरनजीत सिंह.

श्रीलंकेचे टी-20 मालिकेसाठी संपूर्ण पथक (Sri Lanka squad for T20 series against India)

दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा (उप-कर्णधार), अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, पथुम निसांका, चरित असालांका, वानेंदु हसरंगा, एशेल बंडारा, मिनोद भानुका, लाहिरु उडारा, रमेश मेंडिस, चामिका करुणारत्ने, बिनुरा फर्नाण्डो, दुष्मंता चमीरा, लक्षण संदाकन, अकिला धनंजय, शिरान फर्नाण्डो, शिरान फर्नांडो, धनंजय लक्षण, इशान जयारत्ने, प्रवीम जयविक्रमा, कसुन रजीता, लाहिरु कुमारा आणि इसरु उडाना.