India vs Sri Lanka, 3rd T20I : श्रेयस अय्यरचे सलग तिसरे अर्धशतक, भारताने श्रीलंकेला केले क्लीन स्वीप
India vs Sri Lanka, 3rd T20I : धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने सहा विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यातील विजयाचे श्रेय श्रेयस अय्यरला जाते. त्याने 44 चेंडूत 69 धावांची नाबाद खेळी खेळली.

India vs Sri Lanka, 3rd T20I : धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतील (IND vs SL) तिसऱ्या सामन्यात भारताने सहा विकेट्स राखून विजय (India wins T20 series) मिळवला. या सामन्यातील विजयाचे श्रेय श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) जाते. त्याने 44 चेंडूत 69 धावांची नाबाद खेळी खेळली. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये अय्यरने अर्धशतके झळकावली. या विजयासह भारताने श्रीलंकेविरुद्धची T20I मालिका 3-0 ने जिंकली (India Clean sweeps Sri Lanka) आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने तिसर्या टी-20 मालिकेत प्रतिस्पर्धी संघाचा धुव्वा उडवला. याआधी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजच्या संघांनाही शर्माजींसमोर मालिकेत एकही सामना जिंकता आला नव्हता.
Also Read:
मोठे लक्ष्य देण्यात श्रीलंका अपयशी
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर श्रीलंकेने (Sri Lanka) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खराब सुरुवातीनंतर कर्णधार शनाकाने पाहुण्या संघाचा डाव सावरला आणि चमिका करुणारत्ने सोबत मिळून 47 चेंडूत 86 धावांची नाबाद भागीदारी केली. कर्णधार दासुन शनाकाच्या बॅटने 38 चेंडूत 74 धावा केल्या. या बळावर निर्धारित 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात श्रीलंकेला 146 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून आवेश खानने दोन बळी घेतले. त्याचवेळी हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
श्रेयस-जडेजाची अतूट भागीदारी
भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या पाच धावा करून बाद झाला. सलामीला आलेल्या संजू सॅमसनने 12 चेंडूत 18 धावा केल्या मात्र सलामीवीर म्हणून मिळालेल्या संधीचा त्याला फायदा घेता आला नाही. यानंतर श्रेयस अय्यर आणि दीपक हुडा यांच्यात भागीदारी झाली. हुडालाही केवळ 21 धावा करता आल्या. नवा फलंदाज व्यंकटेश अय्यरने पाच धावांचे योगदान दिले. इथून पुढे रवींद्र जडेजाने श्रेयस अय्यरची साथ दिली. जडेजाने 15 चेंडूत 22 धावा केल्या. त्याने अय्यरसोबत 45 धावांची अभेद्य भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला. टीम इंडियाने 19 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.
श्रेयस अय्यर विराटच्या क्लबमध्ये
भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरची बॅट सध्या चांगलीच गाजत आहे. अय्यरने तीन सामन्यांत 204 धावा केल्या. तिन्ही सामन्यांत श्रीलंकन संघाचे गोलंदाज त्याला बाद करू शकले नाहीत. या चमकदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर तसेच मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. यासह अय्यर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. याआधी भारतासाठी मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये फक्त विराट कोहलीलाच अर्धशतक झळकावता आले होते. अशी कामगिरी करणारा श्रेयस अय्यर दुसरा भारतीय ठरला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या