कोलंबो : भारत आणि श्रीलंका या दोन संघात आजपासून 3 टी-20 सामन्याची मालिका सुरू होत आहे. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडीयमवर सायंकाळी 7 वाजता सामना सुरू होणार आहे. यापूर्वी भारताने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली आहे. या मालिकेतूनही प्रशिक्षक राहुल द्रविड काही युवा खेळाडूंना आजमावून पाहण्याची शक्यता आहे.Also Read - India vs Sri Lanka: युजवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम कोरोना पॉझिटिव्ह, BCCI नं केला मोठा खुलासा

या सामन्यात भारताचा युवा खेळाडू वरुण चक्रवर्तीचं (Varun Chakravarthy) पदार्पण होण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे अनेकवेळा आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पणापासून दूर राहिलेला फिरकीपटू वरुण चक्रवर्ती श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसण्याची शक्यता आहे. Also Read - India vs Sri Lanka 2nd T20 LIVE: रोमांचक सामन्यात श्रीलंकेची भारतावर 4 विकेटनी मात; मालिकेत 1-1 ने बरोबरी

पहिला टी-20 सामना कसा पाहाल? Also Read - क्रुणाल पंड्यानंतर Shikhar Dhawan ला देखील कोरोनाची लागण! कोण करणार संघांच नेतृत्व?

भारत विरुद्ध श्रीलंका (India Vs Shri Lanka 1st T20I) टी-20 मालिकेचे प्रसारण भारतात ‘सोनी स्पोर्ट-2’ करणार आहे. मालिकेचा पहिला टी-20 सामना सोनी टेन-2 आणि सोनी टेन-2 एचडी चॅनेलवर पाहता येईल.

पहिल्या टी-20 सामन्याचे लाइव स्ट्रीमिंग

भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या टी-20 सामन्याचे थेट प्रक्षेपण ‘सोनी लिव्ह’ अॅपवर पाहता येईल.

पहिला टी-20 सामना केव्हा आणि कोठे खेळला जाईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना 25 जुलै रोजी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजता सुरू होईल.

भारतीय संघाचे संपूर्ण पथक (India squad for T20I series against Sri Lanka)

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पाडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, राहुल चाहर, के. गौतम, क्रुणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उप-कर्णधार), दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज : ईशान पोरेल, संदीप वारियर, अर्शदीप सिंह, साई किशोर आणि सिमरनजीत सिंह.

टी-20 मालिकेचे वेळापत्रक (India vs Sri Lanka, T20I Series Schedule)

दिवस सामना ठिकाण वेळ
25 जुलै भारत विरुद्ध श्रीलंका आर. प्रेमदासा स्‍टेडियम, कोलंबो सायंकाळी 7 वाजता
27 जुलै भारत विरुद्ध श्रीलंका आर. प्रेमदासा स्‍टेडियम, कोलंबो सायंकाळी 7 वाजता
29 जुलै भारत विरुद्ध श्रीलंका आर. प्रेमदासा स्‍टेडियम, कोलंबो सायंकाळी 7 वाजता