Top Recommended Stories

IPL 2022: ब्राव्होच्या नव्या डान्सची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल !

IPL 2022: मुंबईतील वानखेडे मैदानावर चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पहिल्या सामना पार पडला. यात चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत कोलकाता नाइट राईडर्सने विजयी सुरुवात केली. दरम्यान, मैदानात ड्वेन ब्राव्होने नेहमी प्रमाणे नवीन डान्स स्टेप सादर करत सर्वांचे लक्ष वेधले.

Updated: March 27, 2022 9:37 AM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

IPL 2022: ब्राव्होच्या नव्या डान्सची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल !

IPL 2022: बहुचर्चित अशा इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15 व्या हंगामाला 26 मार्चपासून सुरूवात झाली आहे. मुंबईतील (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात पहिल्या सामना पार पडला. यात चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत कोलकाता नाइट राईडर्सने विजयी सुरुवात केली. दरम्यान, मैदानात ड्वेन ब्राव्होने (Dwayne Bravo) नेहमी प्रमाणे नवीन डान्स स्टेप (Dwayne Bravo Dance) सादर करत सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या डान्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 131 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा सामना करत असताना कोलकात्याच्या संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र झटपट तीन विकेट कोलकाता संघाने गमावल्या. यात ड्वेन ब्राव्होने व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणाला बाद केले.

विकेट्स घेताच केले सेलिब्रेशन

वेस्ट इंडिजचे सर्वच खेळाडू त्यांच्या खास सेलिब्रेशनसाठी ओळखले जातात. कोणी सॅल्यूट करुन तर कोणी गंगनम  स्टाईल सारख्या गाण्यावर नाचतो. हे सर्व सेलिब्रेशन चाहत्यांनी पहिले आहे. आता ड्वेन ब्राव्होच्या डान्सची देखील भर यात पडली आहे. ड्वेन ब्राव्होने व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणाला बाद केल्यावर सेलिब्रेशन म्हणून डान्स केला. ड्वेन ब्राव्हो हा नेहमीच आपल्या वेगळ्या अंदाजात सेलिब्रेशन करत असतो चाहत्यांना देखील तो कसं सेलिब्रेशन करतो याची उत्सुकला असते. व्यंकटेशला बाद करताच ड्वेन ब्राव्होने मैदानात हटके स्टेप करत चाहत्यांचे लक्ष वेधले. ड्वेन ब्राव्होचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

You may like to read

काय आहे व्हिडिओत

व्यंकटेश अय्यरला बाद केल्यानंतर ड्वेन ब्राव्होने डान्स स्टेप करत सेलिब्रेशन केले. या स्टेपमध्ये ब्राव्होने एक हात कंबरेवर ठेवून एका हाताने एकचा आकडा दाखला आहे. हे सेलिब्रेशन म्हणजे त्याच्या ‘नंबर वन’ या नव्या गाण्यावरील स्टेप आहे. बऱ्याच जणांना माहीत नसेल की, ड्वेन ब्राव्हो हा एक प्रोफेशनल डिजे आणि गायक आहे. तो त्याच्या नवीन गाण्याच्या स्टेप मैदानावर सेलिब्रेशन म्हणून वापरत असतो. गाण्याची जाहिरात आणि चाहत्यांचे मनोरंजन हा त्यामागचा हेतू असल्याचे ड्वेन ब्राव्हो सांगतो. दरम्यान, ड्वेन ब्राव्होचा हा नवीन डान्स सेलिब्रेशन चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत या स्टेपची जोरदार चर्चा होत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.