Top Recommended Stories

CSK vs KKR: कोलकाताची विजयी सलामी! 6 विकेटने जिंकला सामना, उमेश यादव ठरला MoM

IPL 2022 CSK vs KKR: आयपीएलच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सहा गडी राखून विजय मिळवला. श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) कोलकाता संघाची धुरा हाती घेतल्यानंतर संघाला पहिला विजय मिळवून दिला आहे.

Updated: March 27, 2022 12:50 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

CSK vs KKR: कोलकाताची विजयी सलामी! 6 विकेटने जिंकला सामना, उमेश यादव ठरला MoM
IPL 2022 CSK vs KKR

IPL 2022 CSK vs KKR: आयपीएलच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सलामीच्या सामन्यात (CSK vs KKR) गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला धूळ चारत (CSK vs KKR) सहा गडी राखून विजय मिळवला. या विजयासह केकेआरने महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई विरुद्ध गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. सीएसकेचा नवा कर्णधार रवींद्र जडेजावर (Ravindra Jadeja) पडलेली नेतृत्वाची जबाबदारीची सुरुवात पराभवाने झाली. तर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) कोलकाता संघाची धुरा हाती घेतल्यानंतर संघाला पहिला विजय मिळवून दिला आहे. दरम्यान सीएसके अडचणीत असताना धोनीने ठोकलेले अर्धशतक व्यर्थ गेले. उमेश यादवने दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. त्यामुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.

दुर्दैवी ठरला अंबाती रायुडू

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने निर्धारित 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 131 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता संघाने नऊ चेंडू बाकी असताना सामना जिंकला. तत्पूर्वी चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर रुतुराज गायकवाड शून्यावर बाद झाला, तर डेव्हिन कॉनवेने तीन धावा करून तंबूत परतला. अवघ्या 28 धावांत चेन्नईचे दोन गडी गमावले होते. रॉबिन उथप्पाने 21 चेंडूत 28 धावा केल्या. तर अंबाती रायुडू दुर्दैवी ठरला. धाव चोरण्याच्या प्रयत्नात कर्णधार रवींद्र जडेजाच्या चुकीमुळे तो धावबाद झाला.

You may like to read

धोनी-जडेजाने डाव सांभाळला

यानंतर धोनी आणि जडेजा यांनी संयमी खेळी खेळत डाव सावरला. दोघांमध्ये 70 धावांची अभेद्य भागीदारी झाली. यादरम्यान धोनीने 38 चेंडूंत सात चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. जडेजाची धावांची गती थोडी मंदावलेली दिसली. परंतु डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून त्याने 28 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या.

रहाणेकडून शानदार फलंदाजी

लक्ष्याचा पाठलाग करताना व्यंकटेश अय्यर 16 (16) आणि अजिंक्य रहाणे 44 (34) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून 43 धावा जोडल्या. नितीश राणा केवळ 21 धावा करू शकला. कर्णधार श्रेयस अय्यर विजयी फटकेबाजी करत 20 धावा करून नाबाद परतला. सॅम बिलिंग्जच्याही बॅटमधून संघासाठी 25 धावा आल्या.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.