Top Recommended Stories

IPL 2022 फायनलमध्ये कॉमेंट्री करणार आमिर खान, 'लाल सिंह चड्ढा'चा ट्रेलर करणार रिलीज

IPL 2022 Final Aamir Khan Commentary : बॉलिवूड अभिनेता आमिर खान चक्क आयपीएलमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहे. आज होणाऱ्या फायनलमध्ये तो समालोचन करणार आहे. तसेच तो याच सामन्यादरम्यान आगामी सिनेमा लाल सिंह चड्ढाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर देखील रिलीज करणार आहे.

Published: May 29, 2022 5:59 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

IPL 2022 फायनलमध्ये कॉमेंट्री करणार आमिर खान, 'लाल सिंह चड्ढा'चा ट्रेलर करणार रिलीज
IPL 2022 Final Aamir Khan Commentary

IPL 2022 Final Aamir Khan Commentary : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचं (Amir Khan) क्रिकेटप्रेम सगळ्यांनाच माहित आहे. क्रिकेटवर आधारित त्याचा ‘लगान’ चित्रपट ऑस्करपर्यंत पोचला होता. त्यातील आमिरची भुवन ही व्यक्तिरेखा आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. आता आमिर खान चक्क क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहे. आमिर आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या आयपीएल 2022 च्या (Indian premier League) फायनलमध्ये समालोचन (Aamir Khan Commentary) करणार आहे. तसेच तो याच सामन्यादरम्यान आगामी सिनेमा लाल सिंह चड्ढाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर (Lal Singh Chadha Trailer) देखील रिलीज करणार आहे.

आमिर खानचे समालोचन करतानाचे पोस्टर ‘कू’वर (Koo App) ट्रेंड होत आहे. आयपीएलमध्ये अमिर खान समालोचन करणार असल्याचे क्रिकेट चाहते आणि आमिरचे फॅन्स अत्यंत उत्साही आहेत. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात विजेतेपदासाठी हा सामना होणार आहे. या सामन्यात आमिरसोबत समालोचन करण्यासाठी काही माजी क्रिकेटपटुही सहभागी होणार आहेत. तो आकाश चोप्रा, इरफान पठाण यांच्यासह इतर समालोचकांसोबत स्टार स्पोर्ट्स स्टुडिओ शेअर करणार आहे.

You may like to read

आमीर नवव्या ते पंधराव्या षटकापर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये असेल असे सांगण्यात आले. केवळ एका संघाच्या फलंदाजीदरम्यानच नाही तर दोन्ही संघांच्या फलंदाजीदरम्यान त्यांना 9व्या ते 15व्या षटकांचा स्लॉट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच सामन्यादरम्यान 15 व्या षटकात आमिरचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’चे ट्रेलर रिलीज केले जाणार आहे. या सर्व सोहळ्याचं प्रसारण स्टार स्पोर्ट्स (Star sports) प्रेक्षकांना थेट पाहता येणार आहे.

हा ट्रेलर सामन्याच्या पहिल्या इनिंगच्या दूसऱ्या टाइम आऊटदरम्यान म्हणजेच रात्री 9:00 ते 9:30 च्या दरम्यान रिलीज होण्याची शक्यता आहे. आज होणारा अंतिम सामना सायंकाळी 7:30 ऐवजी रात्री 8 वाजता सुरू होईल. या चित्रपटात आमिर खानसह करीना कपूर आणि मोना सिंह यांच्याही मुख्य भूमिका आहेत. टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गंप’ (Forrest Gump) या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते अतिशय उत्सुक आहेत.


Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>