Top Recommended Stories

IPL 2022 Final: अंतिम सामन्यापूर्वी होणार समारोप समारंभ, ए आर रहमान-रणवीर सिंग करणार परफॉर्म

IPL 2022 Final: आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी 45 मिनिटांचा समारोप सोहळा (IPL 2022 Closing Ceremony) होणार आहे. 45 मिनिटे चालणार आहे. 2018 सालानंतर प्रथमच आयपीएलचा समारोप सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात ऑस्कर पुरस्कार विजेते गायक आणि संगीतकार ए.आर. रहमान आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग परफॉर्म करणार आहेत.

Published: May 29, 2022 1:50 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

IPL 2022 Final: अंतिम सामन्यापूर्वी होणार समारोप समारंभ, ए आर रहमान-रणवीर सिंग करणार परफॉर्म
IPL 2022 Final GT vs RR

IPL 2022 Final GT vs RR: इंडियन प्रिमियर लिगचा 2022 चा (Indian Premier League 2022) अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) या दोन तगड्या संघात होणार आहे. विजेतेपदाचा हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) सांयकाळी 7.30 ऐवजी रात्री 8.00 वाजता सुरू होणार आहे. त्यापूर्वी 6.30 वाजता समारोप समारंभ सुरू होईल. या सोहळ्यात प्रसिद्ध सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.

Also Read:

45 मिनिटं चालेल समारोप समारंभ

या हंगामाचा समारोप सोहळा (IPL 2022 Closing Ceremony) 45 मिनिटे चालणार आहे. 2018 सालानंतर प्रथमच आयपीएलचा समारोप सोहळा होणार आहे. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या शोक सभेमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता, तर गेल्या दोन हंगामात कोरोनामुळे त्याचे आयोजन करण्यात आले नव्हते.

You may like to read

ए आर रहमान करणार परफॉर्म

या समारोप समारंभात ऑस्कर पुरस्कार विजेते गायक आणि संगीतकार ए.आर. रहमान (AR Rahman) आपल्या संगीताच्या जादूने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत तर, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) देखील चाहत्यांचे जबरदस्त मनोरंजन करताना दिसणार आहे. त्यांच्याशिवाय मोहित चौहान (Mohit Chauhan) आणि बेनी दयाल (Beni Dayal) हे देखील या समारंभात परफॉर्म करताना दिसणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे देखील विजेतेपदाचा सामना पाहण्यासाठी अहमदाबादला पोहोचू शकतात असे मानले जात आहे.

कोण उंचावणार ट्रॉफी?

पहिलाच हंगाम खेळणाऱ्या गुजरातला ट्रॉफी जिंकण्याची संधी सोडायला आवडणार नाही. दुसरीकडे आयपीएलचा पहिला मोसम आपल्या नावावर करणाऱ्या राजस्थानने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे दुसरे विजेतेपद मिळवण्यासाठी रॉयल्स कोणतीही कसर सोडणार नाहीत. क्वालिफायर-1 मध्ये गुजरातने राजस्थानचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे अंतिम सामना चुरशीचा होणार यात शंका नाही.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या