IPL 2022 : हार्दिक पांड्या बनला अहमदाबाद टीमचा कर्णधार; शुभमन गिल आणि राशिद खानही संघात सामिल
इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवे संघ सहभागी होणार आहेत. यातील अहमदाबाद फ्रँचायझीने भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याची कर्णधार म्हणून निवड केली आहे.

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15 व्या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवे संघ सहभागी होणार आहेत. यातील अहमदाबाद फ्रँचायझीने (Ahmedabad Franchise) भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याची (Hardik Pandya) कर्णधार म्हणून निवड केली आहे. याशिवाय अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान (Rashid Khan) आणि भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) हे देखील अहमदाबाद (Ahmedabad Team) फ्रँचायझीमध्ये सामील होणार आहेत.
Also Read:
- Hardik Pandya: हार्दिक होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार, रोहित-विराट संघाबाहेर होण्याची शक्यता
- Team India: न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाचे नेतृत्व करणार 'हा' दिग्गज खेळाडू; रोहित, विराटला विश्रांती!
- IND vs SA World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज, रोहित शर्मा प्लेइंग 11 मध्ये या खेळडूंना देणार संधी?
पीटीआयमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार आयपीएलच्या आगामी हंगामासाठी (IPL 2022) अहमदाबाद फ्रँचायझीने (Ahmedabad Franchise) तिन खेळाडूंची निवड केली आहे. यात हार्दिक पांड्याकडे कर्णधार पादाची जबाबदारी दिली असून त्याला 15 कोटी रुपये मानधन मिळाले आहे. याशिवाय लेगस्पिनर रशीद खानची 15 कोटी रुपयांत आणि शुभमन गिलची 7 कोटी रुपये मानधन देऊन निवड करण्यात आली आहे.
आयपीएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “अहमदाबादने आपल्या खेळाडूंचा निर्णय घेतला आहे आणि बीसीसीआयला (क्रिकेट बोर्ड ऑफ इंडिया) त्यांच्या निवडीबद्दल माहिती दिली आहे. हार्दिक, रशीद आणि शुभमन हे त्यांचे तीन आवडते खेळाडू आहेत.
“अहमदाबाद फ्रँचायझीला इशान किशन (Ishan Kishan) देखील संघात हवा होता. परंतु त्याला लिलावात जाण्यात जास्त रस असल्याचे समजते. मुंबई इंडियन्स फ्रँचायझी त्याच्यासाठी मोठी बोली लावण्याची दाट शक्यता आहे.”
दरम्यान, आयपीएलच्या पुढील हंगामात (IPL 2022) दोन नव्या संघाचा समावेश होणार आहे. आता आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 संघ खेळणार आहेत. बीसीसीआयने (BCCI) यापूर्वीच याबाबत घोषणा केली आहे. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन फ्रँचायझी 2022 च्या आयपीएलच्या हंगामात खेळणार आहे. बोर्डाने घेतलेल्या लिलावात लखनऊ संघाचे मालकी हक्क आरपीएसजी ग्रुपने मिळवले आहेत. तर अहमदाबाद फ्रँचायझी सीव्हीसी कॅपिटल्सकडे गेली आहे. लखनऊ संघ 7,090 कोटी रुपयांना विकला गेला, तर अहमदाबाद फ्रेंचाइजीची किंमत 5,600 कोटी रुपये आहे. दोन्ही फ्रँचायझी आयपीएलशी जोडल्याने बीसीसीआयची एकूण 12,690 कोटी रुपयांची कमाई होणार
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या