IPL 2022 : दुबईत नाही तर महाराष्ट्रात होणार आयपीएलच्या 15व्या हंगामाचं आयोजन! या चार स्टेडियमध्ये रंगणार सामने?
आयपीएला आगामी हंगाम हळूहळू जवळ येत आहे. 2019 नंतर दोन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर 2021 मध्ये भारतात आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोना विषाणूमुळे तो हंगाम देखील मध्यात थांबवून पुन्हा युएईच्या भूमीवर आयोजित करण्यात आला होता.

IPL 2022 season to be held in Maharashtra : आयपीएला आगामी हंगाम (IPL 2022) हळूहळू जवळ येत आहे. 2019 नंतर दोन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर 2021 मध्ये भारतात आयपीएलचे आयोजन (IPL Organizing) करण्यात आले होते. मात्र कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) तो हंगाम देखील मध्यात थांबवून पुन्हा युएईच्या (UAE) भूमीवर आयोजित करण्यात आला. भारतात कोरोनाची (Covid-19) वाढती प्रकरणे पाहता या वर्षीही देशात आयपीएल होणार की नाही हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. मात्र यावेळी बीसीसीआय (BCCI) आयपीएल देशात खेळवण्याचा विचार करत आहे.
Also Read:
- Coronavirus Updates: चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक! हॉस्पिटलमध्ये जमिनीवर उपचार तर स्मशानात अंत्यसंस्कारासाठी वेटिंग
- Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार! केंद्र सरकार सतर्क, राज्यातही टास्क फोर्स गठीत होणार
- IPL Auction 2023 साठी खेळाडूंची यादी जाहीर, 405 क्रिकेटर्सचा समावेश; 23 डिसेंबरला होणार फैसला!
आयपीएल 2022 भारतातच होणार?
देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांनी बीसीसीआयला (BCCI) पुन्हा एकदा आयपीएलचे आयोजन (Organizing the IPL) भारतात करणाबाबतचा विचार करायला भाग पाडले आहे. मात्र यांदा आयपीएल भारतातच खेळवण्याचा बीसीसीआय विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेनुसार बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की “आयपीएल 2022 (IPL 2022) देशातच आयोजित केले जाईल आणि ते यापुढे परदेशात हलवले जाणार नाही. बीसीसीआयने देशातील काही शहरांमध्ये आयपीएल आयोजित करण्याची योजना आखली आहे”.
राज्यातील या 4 स्टेडियममध्ये केले जाऊ शकते सामन्यांचे आयोजन
एएनआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार “राज्यातील एकूण 4 स्टेडियममध्ये सामने आयोजित केले जाऊ शकतात. त्यामुळे मुंबईतील 2, नवी मुंबईतील 1 आणि पुण्यातील 1 अशा चार 4 स्टेडियमचा समावेश आहे. हे सर्व सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium), बेब्रॉन स्टेडियम (Brabourne stadium) आणि नवी मुंबईतील डी वाय पाटील (D Y Patil Stadiun) स्टेडियममध्ये खेळवले जाऊ शकतात. तसेच जर गरज पडली तर पुण्यातील गहुंजेमधील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्येही (Gahunje Stadium) सामने खेळवले जाऊ शकतात..आयोजित केले जातील, असंही अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय.
#IPL2022 will be held in India without a crowd. Likely venues are Wankhede Stadium, Cricket Club of India (CCI), DY Patil Stadium in Mumbai & Pune if needed: Top sources in BCCI to ANI
— ANI (@ANI) January 22, 2022
प्रेक्षकांशिवाय होणार आयपीएल?
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या सूत्राने (BCCI sources) स्पष्ट केले आहे की “आयपीएल 2022 फक्त मुंबईच्या आसपासच्या काही शहरांमध्येच होणार आहे. त्याचवेळी बीसीसीआयचे स्पष्ट म्हणणे आहे की कोरोनाची प्रकरणे पाहता प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही (IPL will be without spectators) आणि सामने रिकाम्या स्टेडियममध्येच होणार आहे. कोरोनामुळे खेळाडूंना बायो-बबलमध्ये (Bio-bubble) राहावे लागते”.
12-13 फेब्रुवारी रोजी लिलाव
दरम्यान, 12 आणि 13 फेब्रुवारीला होणाऱ्या आयपीएळ 2022 मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction)बेंगळुरूच्या (Bengaluru) निवडीवरही चर्चा होत आहे. हा लिलाव दक्षिणेकडील शहराबाहेर हलविला जाईल की नाही हे सध्या स्पष्ट झाले नाही. परंतु पर्याय म्हणून मुंबईकडेही (Mumbai) पाहिले जात आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या