IPL 2022: शेवटच्या ओव्हरमध्ये प्लॅन चुकला, पंजाबविरुद्ध पराभवानंतर रवींद्र जडेजा संतप्त!
IPL 2022 : आयपीएलच्या यंदाच्या सीझनमधील 38 व्या साखळी सामन्यात पंजाबने चेन्नईवर 11 धावांनी विजय मिळवला. हा चेन्नईचा या हंगामातला 6 वा पराभव ठरला. त्यामुळे चेन्नईचा प्लेऑफपर्यंतचा प्रवास अधिक खडतर झाला आहे.

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) पंजाब विरूध्द चेन्नई (PBKS vs CSK) सामन्यात सोमवारी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब किंग्जने (Punjab Kings) 11 धावांनी चेन्नईचा पराभव केला. दरम्यान या स्पर्धेतील चेन्नईचा (CSK ) हा सहावा पराभव ठरला. सामना गमावल्यानंतर कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) चांगलाच संतापला. अखेरच्या षटकात आम्ही धावा रोखू शकलो असतो, परंतु प्लॅनप्रमाणे गोलंदाजी झाली नाही, अशा शब्दांत जडेजाने गोलंदाजांवर नाराजी व्यक्त केली
Also Read:
- TATA IPL 2023 Mini Auction Date, Time, Venue, Teams: सॅम कर्रन आणि कॅमरून ग्रीनवर सर्वाधिक बोली
- Fifa World Cup: क्रोएशियाला पराभूत करुन अर्जेंटीनाची सहाव्यांदा फायनलमध्ये धडक! मेस्सीची जादू कायम
- Laziest Cricketers : हे आहेत जगातील सर्वात आळशी क्रिकेटपटू, यादीमध्ये भारताच्या या अष्टपैलू खेळाडूचाही समावेश!
या सामन्यात पंजाबने पहिल्यांदा फलंदाजी करत 4 विकेट्स गमावत 187 धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करत असलेल्या चेन्नईला पंजाब संघाने 176 धावांवर रोखले. दरम्यान पराभव पत्कारावा लागल्यामुळे संतप्त झालेला रवींद्र जडेजा म्हणाला ‘आम्ही खूप चांगली सुरुवात केली होती. पण मला वाटतं, शेवटच्या 2-3 ओव्हरमध्ये 10-15 धाव जास्त गेल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये आम्ही जसा प्लॅन केला होता तसं करू शकलो नाही.’
अंबाती रायडूचं कौतुक
या सामन्यात 39 चेंडूत 78 धावांची खेळी करणाऱ्या अंबाती रायडूचं रवींद्र जडेजाने कौतुक केले. तो म्हणाला ‘मला वाटतं की रायुडूने चांगली फलंदाजी केली. मात्र आम्ही पंजाब संघाला 170-175 धावांच्या खाली रोखू शकलो नाही. आमची फलांजीची सुरुवात देखील खराब झाली. त्यामुळे लक्ष गाठण्यास जड गेले असे रवींद्र जाडेजा म्हणाला. यंदाच्या आयपीएल सामन्यात चेन्नईच हा 6 वा पराभव होता. या पराभवामुळे चेन्नईचा प्लेऑफपर्यंतचा प्रवास कठीण झाला आहे.
दरम्यान, आयपीएलच्या पॉईंट टेबलनुसार पंजाब किंग्ज 6 व्या स्थानावर आहे. तर चेन्नई 9 व्या स्थानावर आहे. पंजाबने या सीजनमध्ये 8 सामने खेळले आहे आणि यातील 4 सामन्यात त्यांना विजय मिळवता आला. तर चेन्नईने देखील 8 सामने खेळले आहे. मात्र यातील केवळ 2 सामने जिंकण्यात चेन्नईला यश आले. चेन्नईने याआधी मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना 3 विकेट्सने जिंकला होता.
चेन्नई विरुद्ध पंजाब कामगिरी
आयपीएलच्या 15 वर्षाच्या इतिहासात चेन्नई आणि पंजाब संघात एकूण 27 सामने खेळले गेले. यात चेन्नईचे पारडं जड असल्याचे दिसते. 27 पैकी 15 सामने चेन्नई संघाने जिंकले आहेत, तर पंजाबला केवळ 12 सामन्यात विजय मिळवता आला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या