IPL 2022 Playoff Schedule : BCCI ने जाहीर केले प्लेऑफचे वेळापत्रक, जाणून घ्या कधी आणि कुठे खेळला जाणार अंतिम सामना
IPL 2022 Playoff Schedule: आयपीएल 2022 च्या प्लेऑफ सामन्यांचे वेळापत्रक आणि ठिकाण बीसीसीआयने जाहीर केले आहे. निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा क्वालिफायर आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

IPL 2022 Playoff Schedule: आयपीएलच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बीसीसआयने (BCCI) सोमवारी इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या (Indian Premier League 2022) प्लेऑफ सामन्यांचे वेळापत्रक आणि ठिकाण (IPL 2022 Playoff Schedule and venue) जाहीर केले. बीसीसीआयने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार पहिला क्वालिफायर (First Qualifier) सामना 24 मे रोजी ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल, तर एलिमिनेटर सामना (Eliminator Match) देखील त्याच मैदानावर 25 मे रोजी खेळवला जाईल. तर दुसरा क्वालिफायर (Second Qualifier) आणि अंतिम सामना (IPL 2022 final) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
Also Read:
IPL 2022 playoff schedule:
24 मे – पहिला क्वालिफायर सामना, कोलकाता (ईडन गार्डन्स)
25 मे – एलिमिनेटर सामना, कोलकाता (ईडन गार्डन्स)
27 मे – दुसरा क्वालिफायर सामना, अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)
29 मे – अंतिम सामना, अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)
बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) सोमवारी सांगितले की पुढील महिन्यात येथील ईडन गार्डन्सवर आयपीएलचे दोन प्ले-ऑफ सामने होणार आहे. सीएबीच्या व्यवस्थापणामुळे बीसीसीआय खूश आहे. या दोन सामन्यांपूर्वी बीसीसीआयच्या टीमने ईडन गार्डनला भेट दिली आणि सुविधांचा आढावा घेतला, असे सीएबीने म्हटले आहे. त्यानंतर टीमने कॅबचे अध्यक्ष अविशेक दालमिया आणि सचिव स्नेहाशिष गांगुली आणि राज्य संघटनेच्या इतर उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर दालमिया म्हणाले “मीटिंग अतिशय फलदायी ठरली. टीम व्यवस्थापणावर समाधानी होती”.
विशेष म्हणजे कोविड-19 महामारीनंतर प्रथमच प्ले-ऑफ सामन्यांदरम्यान 100 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्यास परवानगी असेल. बीसीसीआयने कोलकाता आणि अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या (Narendra Modi Stadium) क्षमतेच्या 100 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली आहे. अहमदाबाद दुसरा क्वालिफायर सामना आणि अंतिम सामन्याचे आयोजन करणार आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या