Top Recommended Stories

IPL 2022 Points Table मध्ये राजस्थान रॉयल्स नंबर 1, जाणून घ्या ऑरेंज-पर्पल कॅपवर कोणाचा कब्जा

IPL 2022 Points Table : आयपीएलच्या 15 व्या मोसमाची धमाकेदार सुरुवात झाली आहे. मंगळवारी राजस्थान रॉयल्सने (RR) मैदानात उतरताच आपले इरादे स्पष्ट केले आणि या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या उभी केली. कर्णधार संजू सॅमसनच्या झंझावाती अर्धशतकामुळे रॉयल्सने सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध 210 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघ केवळ 149 धावा करू शकला.

Updated: March 30, 2022 6:37 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

IPL 2022 Points Table मध्ये राजस्थान रॉयल्स नंबर 1, जाणून घ्या ऑरेंज-पर्पल कॅपवर कोणाचा कब्जा
IPL 2022 Points Table

IPL 2022 Points Table : आयपीएलच्या 15 व्या मोसमाची धमाकेदार सुरुवात झाली आहे. मंगळवारी राजस्थान रॉयल्सने (RR) मैदानात उतरताच आपले इरादे स्पष्ट केले आणि या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या उभी केली. कर्णधार संजू सॅमसनच्या (Sanju Samson) झंझावाती अर्धशतकामुळे रॉयल्सने सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध 210 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघ केवळ 149 धावा करू शकला. या मोठ्या विजयामुळे राजस्तान रॉयल्सनेही पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.

तत्पूर्वी रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) पंजाबविरुद्ध 2 बाद 205 धावा केल्या होत्या. मात्र पंजाबनेही 6 चेंडू राखून या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत 208 धावा करून विजय मिळवला. या मोसमात आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) नावावर आहे. सीएसकेने त्यांच्या पहिल्या सामन्यात केवळ 131 धावा केल्या होत्या. आता सर्व 10 संघांनी आपापले पहिले सामने खेळले आहेत. राजस्थान रॉयल्स जबरदस्त नेट रनरेटच्या जोरावर पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. तर सनरायझर्स हैदराबाद संघ तळाशी आहे.

You may like to read

क्रम संघ सामने नेट रनरेट गुणतालिका
1 राजस्थान रॉयल्स 1 3.050 2
2 दिल्ली कॅपिटल्स 1 0.914 2
3 पंजाब किंग्स 1 0.697 2
4 कोलकाता नाईट रायडर्स 1 0.639 2
5 गुजरात टाइटन्स 1 0.286 2
6 लखनऊ सुपर जायंट्स 1 -0.286 0
7 चेन्नई सुपर किंग्स 1 -0.639 0
8 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 1 -0.639 0
9 मुंबई इंडियन्स 1 -0.697 0
10 सनरायझर्स हैदराबाद 1 -3.050 0

स्पर्धेत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) पहिल्या डावातील 88 धावांच्या जबरदस्त खेळीमुळे अव्वल स्थानावर आहे. पर्पल कॅपबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत एक सामना खेळून एकूण 5 गोलंदाजांनी 3-3 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. परंतु दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) सर्वात कमी 18 धावां देऊन 3 बळी घेतले. त्यामुळे तो या यादीत आघाडीवर आहे.

IPL 2022 Orange Cap List

फाफ डू प्लेसिस (RCB) – 1 सामना, 88 धावा
इशान किशन (MI) – 1 सामना, 81 धावा
दीपक हुडा (LSG) – 1 सामना, 55 धावा
आयुष बडोनी (LSG) – 1 सामना, 54 धावा
महेंद्रसिंग धोनी (CSK)- 1 सामना, 50 धावा
ललित यादव (DC)- 1 सामना, 48 धावा
अजिंक्य रहाणे (KKR)- 1 सामना, 44 धावा

IPL 2022 Purple Cap List

कुलदीप यादव (DC) – 1 सामना, 3/18
ड्वेन ब्राव्हो (CSK) – 1 सामना, 3/20
युझवेंद्र चहल (RR) – 1 सामना, ३/22
मोहम्मद शमी (GT)- 1 सामना, 3/25
बेसिल थंपी (MI) – 1 सामना, 3/35

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.