By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
IPL 2022: पंजाब किंग्सचा दणदणीत विजय, आरसीबीचा 5 विकेट्सने केला पराभव!
IPL 2022: आरसीबीने आक्रमक फलंदाजी करत पंजाबसमोर 206 धावांचे आव्हान ठेवले. पंजाबने सुद्धा जबरदस्त फलंदाजी करत हा सामना आपल्या खिशात घातला.

IPL 2022 : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामातील तिसरा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (RCB) खेळला गेला. हा सामना खूपच रोमांचकारी ठरला. अटीतटीच्या ठरलेल्या या सामन्यामध्ये पंजाबने आरसीबीचा 5 विकेट्सने पराभव केला. या सामन्यामध्ये टॉस जिंकून पंजाबच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीने आक्रमक फलंदाजी करत पंजाबसमोर 206 धावांचे आव्हान ठेवले. पंजाबने सुद्धा जबरदस्त फलंदाजी करत हा सामना आपल्या खिशात घातला. फलंदाजीमध्ये पंजाबच्या संघाने जोरदार फटकेबाजी करत आपल्या टीमला विजय मिळवून दिला.
या सामन्यादरम्यान आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसिसच्या (Faf du Plessis) मेहनतीवर पाणी फिरलं. कराण पंजाबसमोर 206 धावांचे आव्हान उभे करण्यासाठी डू प्लेसिसने चांगली कामगिरी केली. त्याने 56 चेंडूंमध्ये 7 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 88 धावा केल्या. विराट कोहलीनं 29 चेंडूत 41 तर, दिनेश कार्तिकनं 14 चेंडूत 32 धावा केल्या. असे असताना सुद्धा शेवटी आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला.
बंगळुरुने दिलेल्या 206 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी किंग्स पंजाबच्या राज बाजवा वगळता सर्वच फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आरसीबीच्या संघाकडून मैदानात उतरलेल्या कॅप्टन मयांक अग्रवाल (Mayank Agrawal) आणि शिखर धवननं (Shikhar Dhavan) संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 71 धावांची भागेदारी केली. मयांक अग्रवालने 24 चेंडूंमध्ये 32 धावा केल्या. शिखर धवनने 29 चेंडूंमध्ये 5 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने संघासाठी 43 धावा केल्या. हर्षल पटेलने फेकलेल्या चेंडूंवर झेलबाद झाल्यामुळे त्याचे अर्धशतक हुकले. तर अशीच स्थिती भानुका राजपक्षे याची झाली. त्याने 22 चेंडूंमध्ये चार षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. पंजाबचा पराभव होईल असे वाटत होते पण शाहरूख खान आणि ओडियन स्मिथनं आक्रमक फलंदाजी करत सामना फिरवला. शाहरूख खाननं 20 बॉलमध्ये 24 तर, ओडियन स्मिथनं 8 बॉलमध्ये 25 धावा केल्या. ज्यामुळे पंजाबच्या संघाला 5 विकेट्स राखून आरसीबीवर दणदणीत विजय मिळवता आला.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या