By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
IPL 2022: आयपीएल 2022चे वेळापत्रक जाहीर, 26 मार्चपासून सुरु होणार सामने!
IPL 2022: 26 मार्च 2022पासून आयपीएलचे सामने सुरु होणार असून 29 मे 2022 रोजी शेवटचा सामना होणार आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

IPL 2022 : आयपीएल 2022च्या (IPL 2022) सामन्यांची आतुरतेन वाट पाहणाऱ्या क्रिकेट प्रेमींसाठी (Sport Lovers) आनंदाची बातमी आहे. 26 मार्च 2022पासून आयपीएलचे सामने होणार आहेत. आयपीएलच्या सामन्यांचे वेळापत्रक (IPL 2022 Schedule) आज जाहीर करण्यात आले आहे. 26 मार्च 2022पासून आयपीएलचे सामने सुरु होणार असून 29 मे 2022 रोजी शेवटचा सामना होणार आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने टाटा आयपीएल 2022 सीझनबाबत काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
आयपीएल 2022च्या (indian premier league 2022) सीझनमध्ये मुंबई (Mumbai) आणि पुण्यातील (Pune) चार ठिकाणी एकूण 70 लीग सामने होणार आहे. तर प्ले ऑफ सामन्यांच्या ठिकाणांबाबत नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. 2011 प्रमाणे यंदाही 10 संघ सामन्यात खेळणार असून त्यांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. ग्रुप ‘ए’मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders), राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals), दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि लखनऊ सुपर जायन्टस् (Lucknow Super Giants) हे संघ असणार आहेत. तर ‘बी’ ग्रुपमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings), सनराईज हैदराबाद (Sunrise Hyderabad), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore), पंजाब किंग्ज (Punjab Kings)आणि गुजरात टाइन्टस (Gujarat Titan) हे संघ असणार आहेत. महत्वाचे म्हणजे, ए ग्रुपमधील प्रत्येक संघाला बी ग्रुपमधील संघाशी सामने खेळायचे आहेत.
दरम्यान, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 20 सामने खेळले जाणार आहेत. तर बेबॉर्न स्टेडियमवर 15, डी. वाय पाटील स्टेडियमवर 20 आणि पुण्यातील एमसीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर 15 सामने खेळले जाणार आहेत. तर ब्रेबॉर्न आणि पुण्यातील एमसीए स्टेडिएमवर तीन-तीन सामने होणार आहेत. दरम्यान, आयपीएल 2022चा मेगा लिलाव 13 फेब्रुवारी रोजी झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात 204 खेळाडूंवर एकूण 5 अब्ज 51 कोटी, 70 लाख रुपयांची बोली लागली. यामध्ये 67 विदेशी खेळाडू होते. या लिलावात इशान किशन (Ishan Kishan) हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या