IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगचा 15व्या हंगाम 27 मार्चपासून, सर्व सामने मुंबई-पुण्यात होणार!
भारतात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत आहे. या दरम्यान बीसीसीआयने (BCCI) इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा सीझन देशातच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL 2022: भारतात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत आहे. या दरम्यान बीसीसीआयने (BCCI) इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2022) 15 वा सीझन देशातच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ANI मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार IPL 2022 चे आयोजन मुंबईतील वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium), क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, मुंबई आणि पुण्यातील DY पाटील स्टेडियमवर (D Y Patil Stadiun) होणार आहे.
Also Read:
- Coronavirus Updates: चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक! हॉस्पिटलमध्ये जमिनीवर उपचार तर स्मशानात अंत्यसंस्कारासाठी वेटिंग
- Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार! केंद्र सरकार सतर्क, राज्यातही टास्क फोर्स गठीत होणार
- IPL Auction 2023 साठी खेळाडूंची यादी जाहीर, 405 क्रिकेटर्सचा समावेश; 23 डिसेंबरला होणार फैसला!
एएनआयशी बोलताना बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी सांगितेल की “आयपीएलचा 15 वा हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल आणि मे अखेरपर्यंत सुरू राहील. याची पुष्टी करताना मला आनंद होत आहे. ही स्पर्धा भारतात व्हावी अशी इच्छा बहुतांश संघमालकांनी व्यक्त केली”.
शाह म्हणाले “बीसीसीआय 2022 च्या हंगामाचे आयोजन करण्यास उत्सुक आहे. यावेळी लीगमध्ये दोन नवीन संघ अहमदाबाद आणि लखनऊ सामिल झाले आहेत. मी तुम्हाला सांगू शकतो की आयपीएल भारतातच कायम खेळले जावे यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. बीसीसीआयने भूतकाळात आपल्या हितधारकांच्या आरोग्य आणि सुरक्षेशी तडजोड केलेली नाही. 12-13 फेब्रुवारीला मेगा लिलाव होणार असून त्यापूर्वी आम्ही ठिकाण ठरवू.
एएनआयच्या वृत्तानुसार सामन्यादरम्यान चाहत्यांना स्टँडमध्ये परवानगी दिली जाणार नाही. नुकतीच भारत-न्यूझीलंड मालिका चाहत्यांसमोर खेळली गेली तेव्हा चाहत्यांना मैदानावर प्रवेश देण्यात आला होता. मात्र आयपीएलदरम्यान चाहत्यांना स्टँडवरून समना पाहण्याची संधी मिळणार नाही.
बीसीसीआयची ही योजना यशस्वी झाली तर 2019 नंतर पहिल्यांदाच आयपीएलचे संपूर्ण आयोजन भारतात केले जाईल. देशातील कोविड-19 परिस्थितीमुळे आयपीएल 2020 चा संपूर्ण हंगाम यूएईला हलवावा लागला होता. तर 2021 मध्ये BCCI ने अर्धी स्पर्धा भारतात आणि अर्धी UAE मध्ये आयोजित केली होती.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार बीसीसीआय दक्षिण आफ्रिकेला बॅकअप पर्याय म्हणून ठेवत आहे. यापूर्वी भारतातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे T20 लीगचा दुसरा हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता.
क्रिकबझच्या आणखी एका रिपोर्टनुसार बोर्ड 27 मार्चपासून स्पर्धा सुरू करण्याचा विचार करत आहे. टीम इंडियाचा व्यस्त देशांतर्गत हंगाम 18 मार्चला संपणार आहे. स्थळ आणि वेळापत्रकाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या