IPL 2022साठी या संघांनी या खेळाडूंना केले खरेदी, कोणला किती रक्कम मिळाली घ्या जाणून!
IPL 2022: आयपीएलची तयारी जोरदार सुरु आहे. संघांनी खेळाडू खरेदीस तयारी सुरु केली तर काही फ्रॅन्चायझीनं खेळाडू रिटेन केले आहे.

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian premier league) अर्थात आयपीएल 2022च्या (IPL) हालचालींना वेग आला आहे. यासाठी संघांनी खेळाडू खरेदीस तयारी सुरु केली तर काही फ्रॅन्चायझीनं (Franchise) खेळाडू रिटेन (Retain) केले आहे. जाणून घेऊया कोणी कोणते खेळाडू रिटेन केले आणि कोणते खेळाडू (Players) लिलावात (Auction) नशीब अजमावणार आहेत…
Also Read:
यापूर्वी आठ संघांनी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. तर आता लखनऊ आणि अहमदाबाद या दोन संघांनी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली. यात लखनऊ संघाने केएल. राहुल, मार्क्स स्टोयनीस आणि रवी विष्णोई यांना करारबद्ध केले आहे. तर अहमदाबाद संघाने अष्टपैलू हार्दिक पंड्या, फिरकीपटू रशीद खान आणि शुभम गिल या तीन खेळाडूंना करारबद्ध केले आहे. त्यानुसार 10 संघांनी लिलावाआधीच काही खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे.
या फ्रॅन्चायझीने केले हे प्लेअर रिटेन –
मुबई इंडियन्स
रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह( 12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी).
चेन्नई सुपर किंग्ज
महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), रवींद्र जडेजा(16 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी).
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी), मोहम्मद सिराज (7 कोटी).
दिल्ली कॅपिटल्स
रिषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.50 कोटी), अँनरीच नॉर्टीजे (6.50 कोटी).
सनराईजर्स हैदराबाद
केन विल्यमसन (14 कोटी), अब्दुल समद (4 कोटी), उमरन मलिक (4 कोटी).
कोलकाता नाईट रायडर्स
आंद्रे रसल( 12 कोटी), वरून चक्रवर्ती (8 कोटी), व्यंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नारायण (6 कोटी ).
पंजाब किंग्ज
मयांक अग्रवाल (12 कोटी), अशदीप सिंह (4 कोटी).
राजस्थान रॉयल्स
संजू सॅमसन (14 कोटी), जॉस बटलर (10 कोटी), यशस्वी जयस्वाल (4 कोटी).
लखनऊ
केएल. राहुल (17 कोटी), मार्क्स स्टायनीस (9.2 कोटी), रवी विष्णोई (4 कोटी).
अहमदाबाद
हार्दिक पंड्या (15 कोटी), रशीद खान (15 कोटी), शुबमन गिल (8 कोटी).
12 आणि 13 फेब्रुवारी रोजी पार पडणार लिलाव
आयपीएलचा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. या लिलावात दहा संघांकडून खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. यामध्ये खर्च करण्यासाठी दहा संघाकडे मोजकीच रक्कम शिल्लक आहे.
कोणत्या संघाकडे किती रक्कम आहे शिल्लक
पंजाब (PBKS) – 72 कोटी
हैदराबाद (SRH) – 68 कोटी
राज्यस्थान (RR) – 62 कोटी
लखनऊ (Lucknow) – 58 कोटी
बंगळरू (RCB) – 57 कोटी
अहमदाबाद (Ahmedabad) – 52 कोटी
मुंबई (MI) – 48 कोटी
चेन्नई (CSK) – 48 कोटी
कोलकाता (KKR) – 48 कोटी
दिल्ली (DC) – 47.5 कोटी
या खेळाडूंचा होणार लिलाव –
रिटेन न झालेल्या खेळाडूंची यादी मोठी आहे. या यादीमध्ये श्रेयस अय्यर, सुरेश रैना, शिखर धवन यांच्यासह क्रृणाल पांड्या, ट्रेंट बोल्ट, इशान किशन, राहुल चहर, ख्रिस लीन, जेम्स निशम, डि कॉक, सुरेश रैना, ड्युप्लेसिस, सॅम करन, ब्राव्हो, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, जोश हेजलवूड, अंबाती रायडू, मिचेल सँटनर, श्रेयस अय्यर, रबाडा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, स्मिथ, हेटमायर, आवेश खान, यजुवेंद्र चहल, देवदत्त पडीकल, हर्षल पटेल, नवदीप सैनी, हसरंगा, कायले जेमिसन, मार्करम, शाहरुख खान, मोहम्मद शमी, दिपक हुड्डा, लिव्हिंगस्टोन, ख्रिस मॉरिस, डेव्हिड मिलर, तरबेज शम्सी, इविन लुईस, भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, डेव्हिड वॉर्नर, मनिष पांडे, जॉनी बेयरस्टो, नटराजन, जेसन रॉय, जेसन होल्डर, मुजीब रहमान, मॉर्गन, दिनेश कार्तिक, नितेश राणा, राहुल त्रिपाठी, कमलेश नाटगरकोटे, कुलदीप यादव, लॉकी फर्गुसन, प्रसिद्ध कृष्णा, शिव मावी, शाकिब अल हसन.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या