Top Recommended Stories

IPL 2022 : आजपासून आयपीएलचा थरार! पहिल्या सामन्यात CSK आणि KKR भिडणार, जाणून घ्या कोण सरस?

IPL 2022 CSK vs KKR Head To Head: जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध क्रिकेट लीग आयपीएचा यंदाचा हंगाम आजपासून सुरू होत आहे. आज पहिल्याच सामन्यात मागील हंगामातील विजेता संघ चेन्नई सुपर किंग्स आणि उपविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स एकमेकांशी भिडणार आहेत.

Updated: March 26, 2022 4:01 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

IPL 2022 : आजपासून आयपीएलचा थरार! पहिल्या सामन्यात CSK आणि KKR भिडणार, जाणून घ्या कोण सरस?
IPL 2022 CSK vs KKR Head To Head

IPL 2022 CSK vs KKR Head To Head: जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध क्रिकेट लीग आयपीएचा (Indian Premier League 2022) यंदाचा हंगाम आजपासून सुरू होत आहे. आज पहिल्याच सामन्यात मागील हंगामातील विजेता संघ चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि उपविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) एकमेकांशी भिडणार आहेत. एकीकडे चेन्नईचा (CSK) माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) आपल्या पदाचा राजीनामा देऊन रविंद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) कर्णधार पदाची धुरा सोपवली आहे. तर दुसरीकडे भन्नाट फॉर्ममध्ये असलेला श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) कोलकाता (KKR) संघाने कर्णधार बनवले आहे. त्यामुळे दोन्ही जुने संघ मात्र नवे कर्णधार आज आमनेसामने येणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium, Mumbai) हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे.

चेन्नई विरुद्ध कोलकाता हेड टू हेड (CSK vs KKR Head To Head)

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 26 सामने खेळले गेले आहेत. यात चेन्नई सुपर किंग्जचं (Chennai Super Kings) पारडं जड आहे. चेन्नईने आतापर्यंत 17 सामने जिंकले आहेत तर 8 सामने गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. चेन्नईकडून कोलकाताविरुद्ध सर्वाधिक खेळी खेळण्याच्या बाबतीत सुरेश रैना (Suresh Raina) अव्वल स्थानावर आहे. रैनाने कोलकाताविरुद्ध नाबाद 109 धावांची खेळी केली आहे. तसेच चेन्नईविरुद्ध सर्वात मोठी खेळी खेळणाऱ्यांमध्ये मनविंदर बिस्ला (Manvinder Bisla) हा KKRचा अव्वल खेळाडू आहे. त्याने चेन्नईविरुद्ध 92 धावा केल्या आहेत..

You may like to read

वानखेडेवर आरसीबीच्या नावावर सर्वोच्च धावसंख्या

आजचा सामना वानखेडेवर स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर एकूण 83 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 40 सामने जिंकले आहेत, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने 43 सामने जिंकले आहेत. या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आरसीबीच्या नावावर आहे. या संघाने मुंबईविरुद्ध 1 गडी गमावून 235 धावा केल्या होत्या, तर सर्वात कमी धावसंख्या कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर आहे. कोलकात्याला मुंबईने अवघ्या 67 धावांत गुंडाळले होते.

Chennai Super Kings Full Squad for IPL 2022: रवींद्र जडेजा, एमएस धोनी, मोईन अली, रुतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू, दीपक चहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महेश दिक्षाना, राजवर्धन हंगेरगेकर, सिमरजीत सिंग, डेव्हॉन कॉनवे, प्रीटोनेर, ड्वेन, ड्वेन. , अॅडम मिलने, शुभ्रांशू सेनापती, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, श्री हरी निशांत, एन जगदीसन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा.

Kolkata Knight Riders Full Squad for IPL 2022 : आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, पॅट कमिन्स, श्रेयस अय्यर, नितीश राणा, शिवम मावी, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, रसिक दार, बाबा इंद्रजीत, चमिका करुणारत्ने, अभिजित सिंग, अभिजित सिंग , अशोक शर्मा, सॅम बिलिंग्ज, आरोन फिंच, टिम साउथी, रमेश कुमार, मोहम्मद नबी, उमेश यादव, अमन खान.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.