Top Recommended Stories

live

TATA IPL 2023 Mini Auction Date, Time, Venue, Teams: सॅम कर्रन आणि कॅमरून ग्रीनवर सर्वाधिक बोली

कोचीमध्ये मिनी ऑक्शन सुरू आहे. पंजाब किंग्सने चेन्नई-मुंबईला पछाडलं असून इंग्लंडचा ऑलराउंडर सॅम कर्रनला 18.50 कोटींमध्ये खरेदी केलं आहे. तर मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपयांत कॅमरून ग्रीनला खरेदी केलं.

Updated: December 23, 2022 3:52 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

आयपीएल 2023 मिनी ऑक्शन
आयपीएल 2023 मिनी ऑक्शन

IPL 2023 Mini Auction Date, Time, Squads: इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2023 च्या 16 व्या सीझनसाठी आज कोचीमध्ये मिनी ऑक्शन सुरू झालं आहे. पंजाब किंग्सने चेन्नई-मुंबईला पछाडलं असून इंग्लंडचा ऑलराउंडर सॅम कर्रनला 18.50 कोटींमध्ये खरेदी केलं आहे. तर मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपयांत कॅमरून ग्रीनला खरेदी केलं. आयपीएलच्या या लिलावात इंग्लंडचा सॅम कर्रन आणि ऑस्ट्रेलियाचा कॅमरून ग्रीनवर सगळ्यांची नजर होती. या दोन्ही क्रिकेटपटूंना खरेदी करण्यासाठी अनेक संघांमध्ये स्पर्धा होती. चेन्नई सुपर किंग्समध्ये 16.25 कोटी रुपयांत बेन स्टोक्स सहभागी झाला आहे.

दुसरीकडे, राजस्थान रॉयल्समध्ये विंडीज ऑलराउंडर जेसन होल्डर दिसणार आहे. जेसनला राजस्थान रॉयल्सने 5.75 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. जेसन होल्डरला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये चूरस सुरू होती. अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारली

यंदा देखील 10 संघ मैदानात उतरणार आहे. आईपीएलचं संघ 87 स्लॉट्ससाठी 405 क्रिकेटपटूंची निवड करतील.

आयपीएलच्या ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट राइडर्स, मुंबई इंडियन्स, सनराइजर्स हैदराबाद, गुजरात टाइटन्स, लखनऊ सुपर जायन्ट्स, रॉयल चॅलेजर्स बंगळुरू,पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे मालक सध्या कोचीत पोहोचले आहेत.

कोणता क्रिकेटपटू, कोणत्या टीममध्ये पाहा संपूर्ण लिस्ट…

केन विलियम्सन- 2 कोटी, गुजरात टायटन्स
हॅरी ब्रूक- 13.25 कोटी, सनरायझर्स हैदराबाद
मयांक अग्रवाल- 8.25 कोटी, सनरायझर्स हैदराबाद
अजिंक्य रहाणे- 50 लाख, चेन्नई सुपर किंग्ज
जो रूट- अनसोल्ड
सॅम करन- 18.50, कोटी, पंजाब किंग्ज
ओडेन स्मिथ- 50 लाख, गुजरात टायट्नस
सिकंदर रझा- 50 लाख, पंजाब किंग्ज
जेसन होल्डर- 5.75 कोटी, राजस्थान रॉयल्स
कॅमरून ग्रीन- 15.5 कोटी, मुंबई इंडियन्स
बेन स्टोक्स- 16.25 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज
लिटन दास- अनसोल्ड
निकोलस पूरन- 16 कोटी, लखनऊ सुपर जाएंट
हेनरिक क्लासेन- 5.25 कोटी, सनराइजर्स हैदराबाद
जयदेव उनादकट- 50 लाख, लखनऊ सुपर जायंट्स
फिल सॉल्ट- 2 कोटी, दिल्ली कॅपिटल्स
जाईल रिचर्डसन- 1.5 कोटी, मुंबई इंडियंस
ईशांत शर्मा- 50 लाख, दिल्ली कॅपिटल्स
एडम झम्पा- अनसोल्ड
आदिल रशीद- 2 कोटी, सनराइजर्स हैदराबाद
मयांक मार्कंडे- 50 लाख, सनराइजर्स हैदराबाद

Live Updates

 • Dec 23, 2022 3:52 PM IST

  IPL 2023 Acution Live : चेन्नई सुपर किंग्समध्ये 16.25 कोटी रुपयांत बेन स्टोक्स झाला सहभागी

 • Dec 23, 2022 3:44 PM IST
  IPL 2023 Acution Live : गुजरात टायटन्स टीममध्ये दिसणार केन विल्यमसन
  – केन विल्यमसन हा सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार होता.
  – गुजरात टायटन्स संघानं केनला 2 कोटींना खरेदी केलं आहे.
 • Dec 23, 2022 3:39 PM IST

  LIVE Updates Tata IPL 2023 Mini Auction: मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपयांत कॅमरून ग्रीनला खरेदी केलं.

 • Dec 23, 2022 3:35 PM IST
  LIVE Updates Tata IPL 2023 Mini Auction: राजस्थान रॉयल्समध्ये विंडीज ऑलराउंडर जेसन होल्डर दिसणार आहे.
  – जेसनला राजस्थान रॉयल्सने 5.75 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे.
  – जेसन होल्डरला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये चूरस सुरू होती.
  – अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारली
 • Dec 23, 2022 1:52 PM IST

  LIVE Updates Tata IPL 2023 Mini Auction: आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये नव्या टाय ब्रेकर नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जाणून नव्या नियमाशी संबंधित माहिती…

 • Dec 23, 2022 1:49 PM IST
  क्रिकेटपटूने IPL 2023 मधून घेतली माघार..
  आयपीएल ऑक्शन 2023 (IPL Auction 2023) च्या आधीच इंग्लंडचा स्टार युवा स्पिनर रेहान अहमद (Rehan Ahmad) याने माघार घेतली आहे.
  – रेहानने नुकताच पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.