IPL New Team Lucknow Super Giants: लखनऊ सुपर जायंट्स असेल केएल राहुलच्या संघाचे नाव, फ्रँचायझीची औपचारिक घोषणा
लखनऊच्या नवीन आयपीएल फ्रँचायझीचे नाव समोर आले आहे. संघाचे नाव लखनऊ सुपर जायंट्स असे असेल. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली हा संघ पहिल्यांदा मैदानात उतरणार आहे.

IPL New Team Lucknow Super Giants: लखनऊच्या नवीन आयपीएल फ्रँचायझीचे (New IPL franchise) नाव समोर आले आहे. संघाचे नाव लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) असे असेल. केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली हा संघ पहिल्यांदा मैदानात उतरणार आहे. लखनऊने 17 कोटी रुपये खर्च करून राहुलला संघात सहभागी करून घेतले आहे. आयपीएलच्या इतिहासात एखाद्या खेळाडूला संयुक्तपणे दिलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे.
Also Read:
याशिवाय या फ्रँचायझीने मार्कस स्टॉइनिसला (Marcus Stoinis) 9.2 कोटी आणि रवी बिश्नोईला (Ravi Bishnoi) 4 कोटी रुपये खर्चून आपल्या संघाचा भाग बनवले आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे. यानंतर मार्चच्या अखेरीस आयपीएलचा नवा हंगाम सुरू होईल.
We wanted the best and we didn't settle for less. 💪🤩#TeamLucknow #IPL2022 @klrahul11 @MStoinis @bishnoi0056 pic.twitter.com/p9oM8M9tHy
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 21, 2022
लखनऊ फ्रँचायझीने (Lucknow franchise) चाहत्यांना नवीन फ्रँचायझीचे नाव सुचवण्यास सांगितले होते. त्यानंतर लाखो चाहत्यांनी त्यांच्या सूचना दिल्या. यानंतर संघाचे मालक डॉ. संजीव गोयंका (Dr. Sanjeev Goenka) यांनी एका व्हिडिओ मेसेजद्वारे संघाच्या नावाची औपचारिक घोषणा (Formal announcement) केली.
View this post on Instagram
यापूर्वी पुण्याच्या संघाचे नावही लखनऊच्या संघाच्या नावासारखे होते. 2017 मध्ये पुणे सुपर जायंट्सने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी देखील संघाचे मालक संजीव गोयंका हेच होते.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या