IPL 2022 Title Sponsor : आयपीएलला मिळाला नवा टायटल स्पॉन्सर, Vivo ला रिप्लेस करत TATA ने मिळवले हक्क

आयपीएल 2022 मध्ये मोठे बदल होणार आहेत. लीगची टाइटल स्पॉन्सर असलेली मोबाइल कंपनी Vivo ने लीगच्या प्रायोजकत्वातून आपले नाव मागे घेतले आहे. आता टाटा ग्रुपने टायटल स्पॉन्सरचे हक्क विकत घेतले आहे.

Updated: January 11, 2022 6:37 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

IPL 2022 Title Sponsor : आयपीएलला मिळाला नवा टायटल स्पॉन्सर, Vivo ला रिप्लेस करत TATA ने मिळवले हक्क
IPL Title Sponsor IPL gets new title sponsor, Tata acquires rights by replacing Vivo

IPL 2022 Title Sponsor : आयपीएल 2022 मध्ये मोठे बदल होणार आहेत. लीगची टाइटल स्पॉन्सर असलेली मोबाइल कंपनी Vivo ने लीगच्या प्रायोजकत्वातून आपले नाव मागे घेतले आहे. आता टाटा ग्रुपने टायटल स्पॉन्सरचे हक्क विकत घेतले आहे. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मंगळवारी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत त्यांनी टाटा समूह आयपीएलचे टाइटल स्पॉन्सर म्हणून येत असल्याचा खुलासा केला आहे.

Also Read:

पुढील हंगामाला असणार ‘टाटा आयपीएल’

इंडियन प्रीमयर लीगचा आगामी हंगाम म्हणजेच आयपीएल 2022 टाटा आयपीएल म्हणून ओळखले जाईल. ब्रिजेश पटेल म्हणाले की ‘विवोने अधिकार हस्तांतरित करण्याची विनंती केली होती. त्यांची विनंती गव्हर्निंग कौन्सिलने मंजूर केली आहे. या अधिकारांच्या हस्तांतरणामुळे बीसीसीआयला केवळ 440 कोटी रुपये मिळतील.

विवोचा दोन वर्षांचा करार बाकी होता

विवोकडे अजून दोन वर्षांची स्पॉन्सरशिप बाकी होती. आता हस्तांतरणानंतर टाटा तेवढ्या कालावधीसाठी म्हणजे पुढील दोन वर्षे आयपीएल प्रायोजित करेल. विवोने 2018 मध्ये आयपीएलसाठी वार्षिक 440 कोटींना शीर्षक प्रायोजकत्व विकत घेतले होते. भारत-चीन सीमा विवादामुळे आयपीएल 2020 च्या हंगामात हा करार पुढे ढकलण्यात आला होता.

विवोने पाच वर्षांसाठी विकत घेतले होते हक्क

विवोने 2018 ते 2022 या पाच वर्षांसाठी 2,190 कोटी रुपयांना IPL च्या टायटल स्पॉन्सरचे हक्क विकत घेतले होते. 2020 मध्ये भारत आणि चीनमधील वाद वाढल्यानंतर ड्रीम-11 ला Vivo च्या जागी IPL चे शीर्षक प्रायोजक बनवण्यात आले. त्यानंतर 2021 मध्ये या लीगचे स्पॉन्सरशिपचे हक्क पुन्हा विवोकडे गेले. मात्र आता कंपनीने पुन्हा लीगमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Vivo हस्तांतरित केले स्पॉन्सरशिपचे हक्क

विवो ब्रँडने आता आयपीएलचे अधिकार टाटाकडे हस्तांतरित केले आहेत. आता आयपीएलला टाटा आयपीएल असे म्हटले जाईल. 2020 च्या आवृत्तीसाठी ड्रीम 11 ही कंपनी आयपीएलची शीर्षक प्रायोजक होती. त्यांनी 222 कोटी रुपयांना प्रायोजकत्व अधिकार घेतले होते. IPL 2020 चा हंगाम कोरोनामुळे UAE मध्ये खेळवण्यात आला होता.

आयपीएल 2022 मध्ये 10 संघ खेळणार

आयपीएल 2022 मध्ये आठ ऐवजी 10 संघ खेळताना दिसतील. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन फ्रँचायझी लीगमध्ये सहभाही होणार आहेत. बीसीसीआयने 25 ऑक्टोबर रोजी आयपीएलसाठी दोन नवीन संघांची घोषणा केली. लखऊला RPSG व्हेंचर्स लिमिटेडने 7090 कोटी रुपयांना आणि अहमदाबादला CVC कॅपिटलने 5625 कोटी रुपयांना विकत घेतले.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 11, 2022 6:32 PM IST

Updated Date: January 11, 2022 6:37 PM IST