मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkarने '83' चित्रपटाच्या टीमचं केलं कौतुक, Ranveer Singhच्या भूमिकेबद्दल म्हणाला...

सचिन तेंडुलकरने या ट्वीटच्या माध्यमातून अभिनेता रणवीर सिंगचे विशेष कौतुक केले आहे.

Updated: January 6, 2022 2:38 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Sachin Tendulkar and Ranveer Singh
Sachin Tendulkar and Ranveer Singh

Sachin Tendulkar On Ranveer Singh: बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार रणवीर सिंग (Actor Ranveer Singh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पादुकोन (Actress Deepika Padukon) यांचा ’83’ चित्रपट (83 Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेल्या भूमिकेपासून ते संपूर्ण टीमचे खूपच कौतुक होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असून रणवीर सिंगच्या अभिनयाचे खूपच कौतुक होत आहे. क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Master Blaster Sachin Tendulkar) नुकताच ’83; चित्रपट पाहिला. हा चित्रपट सचिन तेंडुलकरला खूप आवडला असून त्याने यासंदर्भात ट्वीट करत 83 चित्रपटाच्या निर्मात्यापासून ते संपूर्ण टीमचे खूपच कौतुक केले आहे. त्याने या ट्वीटच्या माध्यमातून अभिनेता रणवीर सिंगचे विशेष कौतुक केले आहे.

Also Read:

कबीर खान (Kabir Khan) दिग्दर्शित ’83’ चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगने कपिल देव यांची भूमका साकारली आहे. सचिन तेंडुलकरने नुकताच हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंवरुन ट्वीट (Sachin Tendulkar Tweet) करत या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे खूपच कौतुक केले. सचिन तेंडुलकरने ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ’83 मध्ये रणवीर सिंगचा एक खूपच सुंदर असा अष्टपैलू परफॉर्मन्स. खरोखरच कपिल देव यांच्या गुणांना मूर्तरूप देत आपल्या पहिल्या वहिल्या विश्वचषक विजयाच्या प्रतिष्ठित क्षणांची आठवण करुन दिली. मला माहित आहे की, या विजयाने त्या लहान मुलाला खरोखर प्रेरणा दिली.’

सचिन तेंडुलकरच्या या ट्वीटला अभिनेता रणवीर सिंगने रिट्वीट (Ranveer Singh Tweet) करत त्यावर कमेंट केली आहे. रणवीर सिंग या ट्वीटमध्ये म्हणाला की, ‘…आणि मग तो लहान मुलगा पुढे अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहिला. धन्यवाद, मास्टर! माझ्यासाठी याचा अर्थ खूप महत्त्वपूर्ण आहे.’ दरम्यान सचिन तेंडुलकर आणि रणवीर सिंग या दोघांच्या ट्वीटला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. सचिनच्या ट्वीटला 36 हजार आणि रणवीरच्या ट्वीटला 18 हजार लाईक्स मिळाल्या आहेत.

महत्वाचे म्हणजे, 83 चित्रपटात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची एक झलक पाहयाल मिळाली आहे. या चित्रपटात एक छोटा मुलगा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा करताना दाखवण्यात आला आहे. कुरळ्या केसांचा हा छोटा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून सचिन तेंडुलकर आहे. सचिन तेंडुलकरचे क्रिकेटवर असणारे प्रेम आणि त्याने देशासाठी दिलेले योगदानाबद्दल सर्वांना माहिती आहे. सध्या सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव असे म्हटले जाते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 6, 2022 2:35 PM IST

Updated Date: January 6, 2022 2:38 PM IST