Top Recommended Stories

Messi confirms retirement : मेस्सीची रिटायरमेंटची घोषणा! वर्ल्डकप फायनलनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून घेणार संन्यास

Messi confirms retirement : आपल्या शेवटच्या विश्वचषकात मेस्सीकडे संघाला विजेतेपदापर्यंत नेण्याची आणि गोल्डन बूट जिंकण्याची मोठी संधी आहे. अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा सामना फ्रान्स किंवा मोरोक्कोशी होणार आहे.

Published: December 14, 2022 1:13 PM IST

By India.com News Desk | Edited by Mohini Vaishnav

मेस्सीची रिटायरमेंटची घोषणा
मेस्सीची रिटायरमेंटची घोषणा

Messi confirms retirement : अर्जेंटिनाच्या (Argentina) फुटबॉल संघाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) 2022 च्या फिफा विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मेस्सी आपल्या देशाकडून शेवटच्या वेळी खेळताना दिसणार आहे. या सामन्यात आपल्या संघाला चॅम्पियन बनवून विश्वचषक जिंकून गोल्डन बूट आपल्या नावावर करण्याची संधी मेस्सीकडे आहे. तसेच मेस्सी रोनाल्डोचा (ronaldo) विक्रम मोडू शकतो.

18 डिसेंबर रोजी फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीनंतर निवृत्त होणार असल्याची पुष्टी खुद्द लिओनेल मेस्सीने केली आहे. क्रोएशियाविरुद्धच्या सेमीफाइनल सामन्यात अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीने पेनल्टीवर गोल करत आपल्या संघाला अंतिम फेरी गाठण्यास मदत केली. त्याच्याशिवाय, ज्युलियन अल्वारेझने दोन उत्कृष्ट गोल केल्यामुळे अर्जेंटिनाने क्रोएशियाचा 3-0 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. यानंतर मेस्सीने स्पष्ट केले की, तो आता अखेरच्या वेळी फायनलमध्ये आपल्या देशासाठी खेळणार आहे.’

You may like to read

मेस्सी पाचवा विश्वचषक खेळत आहे

35 वर्षीय मेस्सीचा हा 5 वा विश्वचषक आहे आणि यामध्ये त्याने आपल्या देशातीलच डिएगो मॅराडोना आणि जेव्हियर मास्चेरानो यांचा चार विश्वचषकांचा विक्रम मोडला आहे. क्रोएशियाविरुद्धच्या पहिल्या सेमीफाइनल सामन्यात त्याने पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर करुन आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. विश्वचषकातील त्याचा हा 5 वा गोल होता आणि आता या विश्वचषकात सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत त्याने फ्रान्सच्या कायलियन एमबापेची बरोबरी केली आहे.

मेस्सीने अर्जेंटिनाच्या माध्यमांना सांगितले की, ‘हे यश मिळवण्याचा मला खूप आनंद होत आहे, फायनलमध्ये आपला अखेरचा गेम खेळून विश्वचषक प्रवास समाप्त करत आहे. अर्जेंटिनाचा कर्णधार म्हणाला, ‘पुढील विश्वचषकसाठी बरीच वर्षे आहेत आणि मला वाटत नाही की मी ते करू शकेन. आणि अशा प्रकारे प्रवास पूर्ण करणे सर्वोत्तम आहे.’

दरम्यान अर्जेंटिनाचा संघ सहाव्यांदा फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यानंतर संघाच्या चाहत्यांनी रस्त्यावर येऊन आनंद साजरा केला. अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा सामना 2018 च्या चॅम्पियन फ्रान्स किंवा मोरोक्कोशी होईल.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.