By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
IPL 2022-PBKS vs RCB: विकेट घेताच मोहम्मद सिराजनं केलं रोनाल्डो स्टाईलनं 'Siuu' सेलिब्रेशन, पाहा VIDEO
पंजाब किंग्जविरुद्ध काल म्हणजेच 27 मार्चला झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (Punjab Kings vs Royal Challengers Bangalore) पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासोबत पंजाबने नवा इतिहास रचला.

IPL 2022-PBKS vs RCB: पंजाब किंग्जविरुद्ध काल म्हणजेच 27 मार्चला झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (Punjab Kings vs Royal Challengers Bangalore) पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासोबत पंजाबने नवा इतिहास रचला. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाबसमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले होते. तरी देखील बंगळुरु संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबने हा सामना 5 गडी राखून खिशात घातला. दरम्यान, बंगळुरुचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज यांची चर्चा होत आहे.
मोहम्मद सिराजने लढतीत 2 विकेट्स घेतल्या. याचे सेलिब्रेशन करण्यासाठी त्याने चक्क क्रिस्टियानो रोनाल्डोची स्टाईल कॉपी केली. विकेट घेताच मोहम्मद सिराजनं केलं रोनाल्डो स्टाईलनं ‘Siuu’ सेलिब्रेशन केले. आता सोशल मीडियावर सिराजचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. मुंबईच्या मैदानात मोहम्मद सिराज रोनाल्डो बनल्याची क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
काय आहे Siuu सेलिब्रेशन?
मोहम्मद सिराजने 4 षटकांत पंजाब किंग्जचे 2 गडी तंबूत पाठवले. याचा आनंद साजरा करत त्याने थेट रोनाल्डोची स्टाईल कॉपी करत मैदानात Siuu सेलिब्रेशन केले. सिराजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु Siuu सेलिब्रेशन नेमकं काय? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याबाबत आम्ही रंजक माहिती आपल्यासाठी घेवून आलो आहे.
Trending Now
‘Siuu’ हा एक स्पॅनिश शब्द आहे. विशेष म्हणजे Siuu हे क्रिस्टियानो रोनाल्डोचे ट्रेडमार्क आहे, असे म्हटले जाते. रोनाल्डो गोल केल्यानंतर 360 डिग्रीमध्ये गोल फिरून त्याचे सेलिब्रेशन करतो. काल मुंबईतील डीवाय पाटील स्टेडिअमवर सिराजने रोनाल्डोची कॉपी करत Siuu सेलिब्रेशन केले. आता सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे.
पाहा Video:
Indian player Md Siraj doing Cristiano Ronaldo celebration SIUUUU after taking 2 wickets in 2 balls.
— . (@ElitxCR7) March 27, 2022
फाफ डुप्लेसीची दमदार फलंदाजी, तरी…
दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने निर्धारित 20 षटकात 2 विकेट गमावत 205 धावा केल्या. सलामीच्या जोडीने शानदार कामगिरी केली. कर्णधार फाफ डुप्लेसी (Faf du Plessis) आणि अनुज रावत या जोडीने अर्धशतकीय भागीदारी केली. अनुजने 21 धावा करून तंबूत परतला. परंतु पंजाबच्या फलंदाजांनी नवा इतिहास रचला. निर्धारित षटकात पाच गडी राखून पंजाबने मोठे लक्ष्य गाठत दणदणीत विजय मिळवला.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या