मुंबई: हिंदुस्थानाच्या फाळणीनंतर भारत–पाकिस्तानमधील (India-Pakistan Dispute) संघर्ष सर्वश्रृत आहे. हा संघर्ष 1947 ते 1981 या कालखंडात चार वेळा झालेल्या (India-Pakistan War) युद्धातून संपूर्ण जगानं पाहिला आहे. आज आपण क्रिकेटच्या मैदानावर देखील भारतविरुद्ध पाकिस्तानच्या लढतीदरम्यान (India-Pakistan Cricket Match)पाहातो आहे. अशातच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यानं भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यावरून शोएब अख्तर चर्चेत आला आहे.Also Read - राहुल द्रविड First Love! त्यानं संन्यास घेतल्यानंतर क्रिकेट बघणंच सोडलं, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि शोएब अख्तर (Shoaib Akhtar) हे दोघे 2007 मध्ये एका पुरस्कार सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर एकत्र आले होते. शोएबनं सचिनची गंमत करत त्याला उचलण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सचिन हा शोएबच्या हातातून निसटला आणि जमिनीवर पडला होता. गंमती गंमतीत सचिनचं काही कमी-जास्त झालं असतं तर भारतीय लोकांनी मला जिवंत जाळलं असतं, असा मोठा खुलासा शोएब अख्तर केला आहे.
Also Read - AB de Villiers Retirement: मिस्टर 360 डिग्री... साऊथ आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्सने केली मोठी घोषणा

शोएब अख्तर यानं ‘स्पोर्ट्सकीडा’ला दिलेल्या इंटरव्हूमध्ये हा खुलासा केला आहे. शोएबनं सांगितलं की, पुरस्कार सोहळ्यात त्यानं गंमत म्हणून सचिन तेंडुलकरला उचलण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो हातातून निसटून जमिनीवर पडला होता. त्यानंतर मला खूप भीती वाटत होती. मला वाटतं होतं की सचिन अनफिट झाला असता तर मला पुन्हा कधीही भारताचा व्हिसा मिळाला नसता. कदाचित भारतीय भूमीवर परत येण्याची संधी मिळाली नसती. इतकंच नाही तर भारताच्या लोकांनी तर मला जिवंत जाळलं असतं. पण सुदैवानं असं काही घडलं नाही. Also Read - मायदेशात परतताच Hardik Pandya सापडला अडचणीत, मुंबई एअरपोर्टवर झाली मोठी कारवाई!

सचिन तेंडुलकर खाली पडला तेव्हा तिथे हरभजन सिंह आणि युवराज सिंह देखील उपस्थित होता. ‘ओह…काय करत आहे’, असं ते म्हणाले होते. या प्रकारानंतर मी सचिनकडे गेला आणि त्याला प्रेमानं मिठी मारली होती, असं शोएबनं पुढे बोलताना सांगितलं.

भारतात सर्वाधिक प्रेम मिळालं…

शोएब म्हणाला की, पाकिस्ताननंतर त्याला भारतात सर्वाधिक प्रेम मिळलं. मी जेव्हा जेव्हा भारतात गेलो तेव्हा मी तिथून चांगल्या आठवणी घेऊनच पाकिस्तानात परत आले आहे.