Top Recommended Stories

Rajesh Verma Passed Away: क्रिकेट विश्वावर शोककळा! मुंबईच्या क्रिकेटपटूने वयाच्या 40 व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप

Rajesh Verma Passed Away: क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. मुंबईचा (Mumbai) माजी खेळाडू आणि 2006-07 रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) विजेत्या संघाचा सदस्य असलेला राजेश वर्माचे (Rajesh Verma Death) रविवारी निधन झाले. राजेशने वयाच्या 40 व्या जगाचा निरोप घेतला.

Published: April 24, 2022 6:02 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Rajesh Verma Passed Away: क्रिकेट विश्वावर शोककळा! मुंबईच्या क्रिकेटपटूने वयाच्या 40 व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप

Rajesh Verma Passed Away: मुंबईचा (Mumbai) माजी क्रिकेटपटू आणि 2006-07 रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) विजेत्या संघाचा सदस्य राजेश वर्माचे (Rajesh Verma Death) रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राजेशच्या अकाली जाण्याने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. राजेशचा सहकारी भाविन ठक्कर (Bhavin Thakkar) याने राजेशच्या निधनाचे वृत्त दिले आहे.

Also Read:

भाविन ठक्करने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राजेश वर्माच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘राजेश या जगात नाही, यावर माझा विश्वासच बसत नाही. आम्ही दोघांनी अंडर 19 क्रिकेटची सुरुवात एकत्र केली होती. आम्ही दोघे वडाळ्यावरुन एकत्र प्रवास करायचो. राजेश आणि मी 20 दिवसांपूर्वी बीपीसीएल दौऱ्यावर होतो. मी त्या दिवशी राजेशसोबत जवळपास 30 मिनिटे गप्पा मारल्या. मात्र, आज पहाटे 4 वाजता राजेश गेल्याचे समजले. राजेश माझ्या जवळचा मित्र होता. तो हरहुन्नरी गोलंदाज होता. त्याच्या यॉर्कर बॉलचा सामना करणे फार अवघड होते.’ असं भाविन आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

You may like to read

कोण होता राजेश वर्मा..?

राजेश वर्मा हा मुंबईचा रहिवासी होता. तो मध्यमगती गोलंदाज होता. राजेशने 2002-03 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 7 प्रथम श्रेणी सामन्यात प्रतिनिधित्व देखील केले होते.

राजेशने अखेरचा सामना 2008 मध्ये पंजाबविरुद्ध खेळला होता. राजेश 2007 मध्ये मुंबई टीमचा भाग होता. तेव्हा टीममध्ये सचिन तेंडुलकर, झहीर खान आणि रोहित शर्मा होते.

अशी होती राजेशची कारकिर्द…

राजेश वर्माने आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात टीम इंडियाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या इएलएफ (ELF) अकादमीतून केली होती. राजेशने 7 लढतींमध्ये 23 विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये एकदा 5 विकेट्सही घेतल्या होत्या. राजेशची 97 धावा देत 5 विकेट्स ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी होती.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 24, 2022 6:02 PM IST