Top Recommended Stories

Ravindra Jadeja Resigns: रवींद्र जडेजाचा कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा, सीएसकेचं नेतृत्त्व पु्न्हा MS Dhoni कडे

Ravindra Jadeja resigns: रवींद्र जडेजाने तडकाफडकी चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर पुन्हा एकदा सर्वांचा चाहता कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीकडे सीएसकेने कर्णधार पदाची धूरा सोपवली आहे. एक निवेदन जारी करून सीएसकेने याबाबत माहिती दिली आहे.

Published: April 30, 2022 8:59 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Ravindra Jadeja Resigns: रवींद्र जडेजाचा कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा, सीएसकेचं नेतृत्त्व पु्न्हा MS Dhoni कडे
Ravindra Jadeja resigns

Ravindra Jadeja resigns: चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाचा (CSK captaincy) अचानक राजीनामा दिला आहे. यानंतर पुन्हा कॅप्टन कूल एमएस धोनीने संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ही जबाबदारी धोनीने (MS Dhoni) पुन्हा स्वीकारण्याची विनंती जडेजाने केल्याचे सांगण्यात ये आहे. या हंगामाची सुरुवात होण्यापूर्वी यलो आर्मी (Yellow Army) सीएसकेची (Chennai Super Kings) धुरा स्वत: एमएस धोनीने जडेजाकडे सोपवली होती. परंतु गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा या मोसमात आतापर्यंतचा प्रवास खराब राहिला आहे. त्यामुळे जड्डूने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Also Read:

जडेजाने राजीनामा दिल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, कर्णधारपदाच्या जबाबदारीपासून स्वत:ला अलिप्त करणार्‍या धोनीने संघाच्या हितासाठी आणि जडेजाने खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यास सहमती दर्शवली आहे आणि आता तो उर्वरित सामन्यांमध्ये चेन्नईचे नेतृत्व करताना दिसणार आहे. धोनीने या संघाला यापूर्वी चार वेळा चॅम्पियन बनवले आहे. या लीगमध्ये सर्वाधिक विजेतेपद पटकावणारा तो मुंबई इंडियन्सनंतरचा दुसरा संघ आहे.

You may like to read

या मोसमात आतापर्यंत एकूण 8 सामने खेळलेल्या CSK संघाला केवळ 2 सामन्यांमध्ये विजय नोंदवता आला आहे. त्याचे केवळ 4 गुणांसह संघ गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. सीएसके केवळ मुंबई इंडियन्सच्या (MI) एका स्थानाने पुढे आहे. मुंबई संघ अजूनही त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. दरम्यान जडेजाने आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा हा निर्णय घेतला आहे.

चेन्नईचा पुढील सामना रविवारी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईचा संघ आता दडपणाखाली असेल पण प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता अजूनही कायम आहे आणि आता संघाचा करिष्माई कर्णधार धोनीने पुन्हा संघाची कमान हाती घेतल्याने चाहत्यांना त्याच्याकडून पुन्हा एकदा या चमत्काराची अपेक्षा असेल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 30, 2022 8:59 PM IST