
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Rohit Sharma Daughter Video : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) इंग्लंडविरुद्धच्या (India vs England 2022) पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी कोविड पॉझिटिव्ह (Covid-19) आढळून आला आहे. रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये (RAT) रोहित शर्मा कोविड पॉझिटिव्ह (Rohit Sharma Health Update) आढळला असून सध्या तो क्वारंटाईन आहे. रोहित शर्मा संघाबाहेर असल्याने बीसीसीआय (BCCI) अडचणीत आले आहे. तर रोहित शर्माचे फॅन्स देखील चिंतेत दिसत आहे.
दरम्यान, 1 जुलैपासून खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत संघाने अद्याप काही स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, रोहितची मुलगी समायरा (Rohit Sharma’s Daughter Viral video) हिचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये समायरा हॉटेलच्या लॉबीमध्ये आई रितिका सजदेह (Rohit Sharma’s Wife Name) सोबत दिसत आहे. इंटरनेटवर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत समायरा हिलातिच्या वडिलांबद्दल म्हणजेच रोहित शर्माबद्दल विचारले असता, ती अतिशय गोंडसपणे बोबडे बोल बोलत म्हणत आहे की, ‘ते आपल्या रूममध्ये झोपले आहेत. ते कोविड पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे त्याच्याजवळ फक्त एकच जण त्या खोलीत राहू शकतो.’ व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत समायरासोबत तिची आई आणि आयाही दिसत आहेत. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून खूपच प्रतिसाद मिळत समायराच्या क्यूटनेसचे कौतुक होत आहे.
<
#RohitSharma Daughter #samaira Today at #Leicester How cute she is 😍😍 MY FATHER IS TAKING REST IN THE ROOM GOT #covidpositive @ritssajdeh @ImRo45 #ENGvIND @ITGDsports pic.twitter.com/Tbpu0HSUIQ
— Krishna sai ✊🇮🇳 (@Krishna19348905) June 27, 2022
h2>टीम इंडियासाठी सलामीला कोण खेळणार?
रोहितची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर BCCI समोर मोठा प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यानुसार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधार कोण असेल आणि सलामीला कोण खेळेल? याची चिंता वाढली आहे. रिपोर्टनुसार, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाण्याचीही शक्यता आहे. तर मयंक अग्रवालला भारतातून इंग्लंडला पाठवण्यात आले आहे. या कसोटी सामन्यात रोहित न खेळल्यास शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल सलामीला खेळू शकतात. तर दुसरीकडे सोशल मीडियावर रोहित शर्माचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित थम्ब्स-अप करताना दिसत आहे. यावरून इंग्लंडविरुद्धच्या कसोटीपर्यंत तो तंदुरुस्त होऊन खेळणार असल्याचीही चर्चा आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या