
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Rohit Sharma Record: भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलला मागे टाकून त्याने हा विक्रम केला आहे. मार्टिन गप्टिलने (martin guptil) दोनच दिवसांपूर्वी स्कॉटलंडविरुद्ध 40 धावा करत रोहित शर्माला मागे टाकले होते, मात्र आता पुन्हा एकदा रोहित शर्मा टी-20 किंग बनला आहे. रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात हा विक्रम केला. ब्रायन लारा स्टेडियम, तारौबा येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात यजमान संघाचा कर्णधार निकलोस पूरन (Niklos Pooran) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात 21 धावा केल्याबरोबर T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या मार्टिन गुप्टिलला मागे टाकले. यासह या फॉरमॅटमध्ये 3400 धावांचा टप्पा पार करणारा भारतीय कर्णधार पहिला खेळाडू ठरला आहे. या सामन्यात रोहितने अर्धशतक झळकावले असून त्याने 64 धावांची भागीदारी केली.
रोहितने 129 टी 20 सामन्यांमध्ये 4 शतक झळकावले आहेत. तर 27 अर्धशतक ठोकले आहेत. त्याने 3 हजार 443 धावा केल्या आहेत. तर मार्टिनच्या नावे 116 सामन्यांमध्ये 2 शतक आहेत. तसेच 20 अर्धशतकांसह 3 हजार 399 धावा त्यांनी आतापर्यंत केल्या आहेत.
या यादीत भारताचा दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 99 टी-20 सामन्यांमध्ये 3308 धावा केल्या आहेत. या दरम्यान, माजी भारतीय कर्णधाराची सरासरी 50.12 आहे आणि बेस्ट स्कोअर 94 आहे. तर आजच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय कर्णधार रोहित शर्माने 44 चेंडूत 64 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले.
रोहित शर्मा (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह
शमरह ब्रूक्स, शिमरोन हेटमायर, रोवमैन पॉवेल, निकोलस पूरन (क्रप्टन आणि विकेटकीपर), काइल मेयर्स, जेसन होल्डर, अकील होसेन, ओडियन स्मिथ, कीमो पॉल, अल्जारी जोसेफ, ओबेद मॅककॉय
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या