Sachin Tendulkar Birthday : टीम इंडियाच्या विरोधात पाकिस्तानसाठी 'सचिन' उतरला होता मैदानात, जाणून घ्या रंजक गोष्टी
Sachin Tendulkar Birthday : वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ( International Cricket ) पदार्पण करणाऱ्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांनी आपल्या कारकिर्दीत 664 आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये 34 हजार 357 धावा काढल्या आहे. यात 100 शतक आणि 164 अर्धशतकांचा देखील समावेश आहे. त्यांनी गोलंदाजीत देखील कमाल दाखवत 201 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहे.

Sachin Tendulkar Birthday : क्रिकेटचा देव (God Of Cricket ) म्हणून ज्याची ओळख आहे अशा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ( Master Blaster Sachin Tendulkar ) यांचा आज म्हणजेच 24 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. सचिन आज आपला 49 वा वाढदिवस (Sachin Tendulkar Birthday ) साजरा करत आहे. सचिन यांनी वयाच्या 16 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ( International Cricket ) पदार्पण करत कमी वयातच त्यांनी मोठं मोठे कीर्तिमान प्रस्थापित केले आहे. सचिन तेंडुलकरांना ओळखत नसेल असा व्यक्ती शोधणे कठीण आहे. अशा या महान खेळाडूबद्दल वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया काही रंजक गोष्टी.
विश्वविक्रम रचणारा ‘सचिन’
वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिन तेंडुलकर यांनी आपल्या कारकिर्दीत 664 आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये 34 हजार 357 धावा काढल्या आहे. यात 100 शतक आणि 164 अर्धशतकांचा देखील समावेश आहे. त्यांनी गोलंदाजीत देखील कमाल दाखवत 201 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहे. यासह क्रिकेट विश्वातील अनेक विश्वविक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावावर असून क्रिकेट आणि सचिन तेंडुलकर हे समीकरण कोणी विसरू शकत नाही. देशाला नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्वाला अभिमान वाटावा अशी त्यांची कारकीर्द आहे. सचिन यांच्या विक्रमाबद्दल तर बहुतांश क्रिकेट प्रेमींना माहिती आहेच परंतु क्रिकेटमधील कारकीर्द दरम्यान सचिन यांच्याशी अनेक रंजक गोष्टी जुळलेल्या आहेत.
भारताच्या विरोधात पाकिस्तानसाठी केली फिल्डिंग
सचिन तेंडुलकर यांनी आपल्या कारकिर्दीत टीम इंडियाची जर्सी घालून धावांचा मोठा डोंगर उभा केला आहे. मात्र फारच कमी लोकांना माहीत असेल, की सचिन यांना टीम इंडियाच्या विरोधात पाकिस्तानसाठी मैदानात उतरावे लागले होते. ही गोष्ट 1987 सालची आहे. जेव्हा सचिन तेंडुलकर यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण देखील झाले नव्हते. दरम्यान, पाकिस्तान टीम पाच कसोटी आणि 6 एक दिवशीय सामने खेळण्यासाठी भारतात आली होती. मालिका सुरु होण्याआधी 20 जानेवारी 1987 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात मुंबई येथील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये 40-40 षटकांचा प्रादर्शनीय सामना खेळला गेला होता. या सामान्या दरम्यान, जेवणाच्या वेळी जावेद मियांदाद आणि अब्दुल कादिर हे दोन्ही मैदानाच्या बाहेर निघून गेले होते. अशात टीम इंडियाच्या फलंदाजी दरम्यान, सचिन तेंडुलकर हे पाकिस्तानच्या बाजूने सब्स्टिट्यूट खेळाडू म्हणून मैदानात उतरले होते. यावेळी सचिन यांचं वय फक्त 13 वर्षे इतकच होत. पाकिस्तानी कर्णधार इमरान खान यांनी त्यांना वाइड लॉन्ग ऑनवर क्षेत्र रक्षणासाठी उभे केले होते. सचिन तेंडुलकर यांनी त्यांची आत्मकथा ‘ प्लेइंग इट माय वे’ यात या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर काही महिन्यांनी सचिन यांनी पाकिस्तानच्या विरोधात टीम इंडियात पदार्पण करत दमदार खेळ सादर केला होता. पाकिस्तानमधील कराची येथे हा कसोटी सामना खेळाला गेला होता. सामन्यात चार विकेट्स गमावत टीम इंडियाने हा सामना जिंकला होता. त्यानंतर सचिनने कधी वळून पहिले नाही.
सचिनसाठी 24 तारीख आहे खास
वाढदिवसासह 24 तारखेशी सचिन यांचे खास कनेक्शन आहे. 24 फेब्रुवारी 1988 साली सचिनने आपल्या बालमित्र विनोद कांबळी याच्या सोबत हैरीश शिल्ड स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 664 धावांची भागीदारी केली होती. यावेळी सचिन 326 तर विनोद कांबळी 349 धावांसह नाबाद राहिले होते. त्यानंतर 24 नोव्हेंबर 1989 रोजी सचिनने 16 व्या वर्षी आपल्या कसोटी सामान्याचे पहिले अर्धशतक झळकविले होते. 24 मे 1995 रोजी सचिन आणि अंजली लग्नाच्या बंधनात अडकले. यासह 24 फेब्रुवारी 2010 रोजी सचिन यांनी दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात ग्वालियरमधील एकदिवशीय सामन्यात द्विशतक केले होते.
Also Read:
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या